शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोह्यांविरोधात राजेशाहीची गरज: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:44 IST

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे ...

सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे अपयश आहे. समाजातील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. देशातून दहशतवाद हद्दपार करणे हीच तुकाराम ओंबळेंना श्रद्धांजली ठरेल,’ अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.जावळी तालुक्यातील केडंबेचे सुपुत्र व मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी शिक्षण सभापती अमित कदम, सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, एस. एस. पारटे, पंचायत समिती सदस्य कांताबाई सुतार, शिवसेना शहरप्रमुख निमेश शहा, शिरीष दिवाकर, विजयराव मोकाशी, मोहनराव कासुर्डे, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी ए. एच. मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, सचिन करंजेकर, रवी चिकणे, सचिन शेलार, भगवान उतेकर, सरपंच वैशाली जंगम, ए. पी. बिडवे, बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, नितीन पारटे, अरविंद सोमवंशी उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, ‘अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केडंबेचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी केले. तुकाराम ओंबळेंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशातून दहशतवादाला हद्दपार करणे हीच हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार आखाडे, सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी टी. आर. ओंबळे, राजाराम जाधव, बाळासाहेब शिर्के, शैलेंद्र सावंत, आशिष भिलारे, दत्तात्रय दरेकर, नंदू चिकणे, विकास सावंत, गणेश गोळे व वीरगर्जना बहुउद्देशीय संस्था नागेवाडीचे पदाधिकारी परिसरातील गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकर जांभळे, चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव, रामचंद्र ओंबळे, किरण ओंबळे, विजय ओंबळे, कुणाल ओंबळे, सुनील ओंबळे यांनी परिश्रम घेतले.आजोबांच्या पराक्रमाची गाथा...तुकाराम ओंबळे यांचा नातू स्वानंद ओंबळे याने ओंबळे यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने केडंबे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य भेट व मेढा, सोमर्डी, कुडाळ, केळघर येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.