शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बाल हक्क संरक्षण कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज : त्रिपाठी

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

साताऱ्यात जनसुनावणी : महिला समुपदेशन केंद्राला पोलीस खात्याने जागा द्यावी

सातारा : जिल्ह्यामध्ये बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी बाल हक्क संरक्षण कायदा प्रभावीपणे राबवावा, असे आदेश महराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सचिव अ. ना. त्रिपाठी यांनी दिले. महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी प्रकरणे, महिलांच्या समस्या, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, सामाजिक प्रश्न, बाल संरक्षण व बाल हक्क्? याबाबतचे प्रश्न, बाल मजूर , निरीक्षण गृह आदी विषयांबाबत जनसुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सचिव त्रिपाठी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे उपसचिव ला. रा. गुजर, राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ, बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य सूर्यकांत कुलकर्णी, राज्य महिला आयोगाचे वरिष्ठ समुपदेशक अर्जुन दांगट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योत्स्ना कापडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्रिपाठी यांनी सुरुवातीला जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निरीक्षण गृहे व बालगृहे यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. जिल्हयात एकूण ३२ बालगृहे व २ निरीक्षण गृहे आहेत, अशी माहिती कापडे यांनी दिली. तसेच बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष जगताप यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेश देताना येत असलेल्या अडचणी व्यक्त केल्या. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनीही जिल्हयात अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या समस्या अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कारवाया व अनैतिक व्यवसायातील महिलांच्या मुलांचे प्रश्न याबाबत माहिती दिली. ते म्हणाले काही ठिकाणी छुपा अनैतिक व्यवसाय असल्याचे निर्दशनास येताच अशा व्यवसायावर धाडी टाकून व्यवसाय बंद केले जातात. संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातात. यामधील महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या कऱ्हाड येथील राज्यगृहात दाखल केले आहे. सचिव त्रिपाठी योवळी म्हणाले, जिल्हयामध्ये महिला समुपदेशन केंद्रांना आवश्यक असलेली पुरेशी जागा पोलीस विभागाने उपलब्ध करुन द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)१४ पैकी ४ प्रकरणांमध्ये तडजोडी यावेळी १४ प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. यातील ४ प्रकरणांमध्ये तडजोडी करण्यात आल्या. उर्वरित ७ प्रकरणांमध्ये म्हणणे ऐकून पुढील तारखा देण्यात आल्या. या जनसुनावणीस विशेष अधिकारी सचिन साळे, समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, सहायक पोलिस निरीक्षक व्ही.व्ही.पाटील, विस्तार अधिकारी एस.एस मोरे, विधी सल्लागार दीपिका बोराडे, समुपदेशक मनीषा बर्गे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष शालिनी जगताप आदी उपस्थित होते.