शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

मोठ्या उद्योगधंद्यांची ढेबेवाडीत गरज

By admin | Updated: November 11, 2014 23:25 IST

आस विकासाची : अनके गावे मूलभूत सुविधांपासून वंचित

सणबूर : ढेबेवाडी परिसराचा विकास म्हणावा तितक्या गतीने झालेला दिसत नाही़ अनेक गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत़ या परिसराचा खऱ्या अर्थाने कायापालट होण्यासाठी ढेबेवाडी येथे एखादा मोठा उद्योगधंदा उभा राहण्याची गरज आहे़ तरच भागाचा कायापालट होऊन सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळेल़ पाटण तालुक्यामधील ढेबेवाडी खोरे अतिशय मागास व विकासापासून पूर्णपणे वंचित खोरे म्हणून ओळखले जाते़ या खोऱ्यातील कारळे, सातर, निवी, कसणी, पळशी, पानेरी, तामिणे, धनगरवाडी आदी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत़ येथील लोकांचे जीवन आदिवासींपेक्षा वेगळे नाही़ स्वातंत्र्योत्तर काळात सर्वत्र विकासकामांचे डोंगर उभे राहत असताना ढेबेवाडी विभाग मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला दिसतो़ दुर्गमता हे त्यापाठीमागील प्रमुख कारण आहे़ तालुक्यातील महत्त्वाचे व प्रमुख ठिकाण म्हणून ढेबेवाडीची ओळख आहे़ येथे मोठा उद्योगधंदा नाही़ पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट आॅफिस, बँका, पतसंस्था, दवाखाना, एसटी बसस्थानक, तलाठी कार्यालय, अशी शासकीय कार्यालये आहेत. मात्र येथील लोकांना कामधंद्यासाठी बाहेर जावे लागते़ परिसरातील बेरोजगारांच्या जीवनात स्थिरता येण्यासाठी गावाकडे उद्योगधंद्यांचे जाळे विणणे गरजेचे आहे़ डोंगराळ गावांमध्ये पशुपालनास पोषक वातावरण असल्याने दुधाचे उत्पादन घेतले जाते; परंतु दुर्गमतेमुळे व्यावसायिक दृष्टिकोन अजून तरी दूध उत्पादकांचा बनलेला नाही़या व्यवसायाची भरभराट होऊन अनेकांना त्यातून उद्योग मिळण्यासाठी दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करण्याचा उद्योग राबविण्याची गरज आहे़ (वार्ताहर)तरुणांचा लोंढा मुंबईकडेया विभागामध्ये बेरोजगारांना दिलासा मिळेल, असा एकही छोटा-मोठा उद्योग नाही परिसरामध्ये बेरोजगारांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ पोटापुरते शिक्षण घेऊन या विभागातून तरुणांचा लोंढा वर्षानुवर्षे मुंबईकडे धावत आहे़ तिथे वाट्याला येणाऱ्या अस्थिर जीवनामुळे कित्येक कुटुंबे अस्वस्थ बनली आहेत़ येथून मुंबईकडे गेलेल्या तरुणांचे मुंबईत माथाडी कामगार, कापड दुकानातील नोकर, हातगाडी ओढणे असेच अस्तित्व आहे़