शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त करणे गरजेचे

By admin | Updated: December 19, 2014 00:23 IST

धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन

सातारा : ‘भारतीय राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त न करता आल्यामुळे आज सामान्य माणसाची दुरवस्था पाहावयास मिळते. या सर्व परिस्थितीचा तरुणांनी अभ्यास करून पुढची वाटचाल करावी. तरच भविष्यकाळ सुकर होऊ शकेल,’ असे प्रतिपादन अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ईस्माईलसाहेब मुल्ला आदर्श रयत सेवक पुरस्कार २०१४’ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दृष्टिकोन होता. त्यासाठी समाजातून हजारो हात पुढे आले. मुल्लासाहेब हे त्यातील बिनीचे शिलेदार होते. भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना वेगवेगळ्या शक्ती, वेगवेगळ्या हेतूने स्वातंत्र लढ्यात सहभागी झाल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही आज विकासाच्या नावावर सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. हा भांडवलदार वर्गाचा डाव आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे.यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, प्रभारी प्राचार्या डॉ. सुजाता पवार, प्रा. फातिमा मुजावर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रा. सी. डी. जडगे, सहसचिव प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, प्राचार्य आर. डी. गायकवाड, एच. वाय. पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, प्राचार्य सायनाकर, प्रा. अजित पाटील, यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते. (प्रतिनिधी)