शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’ स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष कृती आराखड्याची गरज

By admin | Updated: June 30, 2016 00:05 IST

उदयनराजे भोसले : निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार; वाई येथील आढावा बैठकीत प्रतिपादन

वाई : सध्या कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार मकरंद पाटील यांनी कंबर कसली असून, जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरूपात हाती घेण्यात आली आहे़ त्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते़ आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार मकरंद पाटील, जि़ प़ चे कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जि़ प़ उपाध्यक्ष रवी सांळुखे, वाईच्या प्रातांधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट, नगरपालिका मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, कोल्हापूरचे अभियंता उदय गायकवाड, नगरसेवक अनिल सावंत, सचिन फरांदे, धनंजय मोरे, महेंद्र धनवे, अनुराधा कोल्हापुरे, वर्षा शेवडे, कैलास जमदाडे, डॉ़ अमर जमदाडे, शोभा शिंदे, विकास शिंदे, विजयसिंह नायकवडी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यामध्ये मकरंद शेंडे, काशीनाथ शेलार, प्रा़ बाळासाहेब कोकरे, धनंजय मलटणे, भवरलाल ओसवाल उपस्थित होते़उदयनराजे भोसले म्हणाले, ‘कृष्णा नदीच्या स्वच्छतेच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखड्याची गरज असून, तो अमलात आणण्यासाठी लागणारा निधी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मिळविण्यात येईल; पंरतु कृष्णेच्या उगमापासून संगमापर्यंत ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ हे सत्यात उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही़.’ खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत कृष्णा नदीवर धोम, गंगापुरी घाट व गणपती घाट यांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला व नगरपालिकेच्या छ़ शिवाजी महाराज सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी कृष्णा नदीच्या स्वच्छतेबाबत लोकचवळ उभी करण्याचे आवाहन केले़ आ़ मकरंद पाटील म्हणाले, ‘कृष्णा नदीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व आहे़ हे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असून, आपल्यासाठी अस्मितेचा विषय आहे. कृष्णा अस्वच्छ होण्याचे मुख्य कारण तिच्यामध्ये सोडले जाणारे दूषित सांडपाणी हे असून, त्याची व्यवस्था केल्याशिवाय कृष्णेची स्वच्छता होणार नाही़ शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात कित्येक वर्षांपासून राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत असून, यासाठी ३५ कोटींचा अपेक्षित खर्च असून, त्यासाठी लागणारी ५० टक्के रक्कम भरण्याची वाई नगरपालिकेची अर्थिक क्षमता नाही़ त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी १०० टक्के अनुदानासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा व निधीची उपलब्धता करावी़ ’आढावा बैठकीत प्रास्ताविकात मुख्याधिकारी आशा राऊत यांनी स्वच्छता अभियानाची माहिती दिली़ त्याबरोबर गटविकासधिकारी दीपा बापट, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, सामाजिक संस्था प्रतिनिधी काशीनाथ शेलार, प्रा़ बाळासाहेब कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)सामाजिक संस्था प्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचा सन्मान ‘कृष्णा’ स्वच्छतेसाठी यापूर्वी अनेक वेळा विविध उपक्रम राबविल्याने व पालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये हिरहिरीने सहभाग घेतल्याने त्याची नोंद घेत खासदार उदयनराजे भोसले व जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल यांच्या हस्ते भगवा कट्टा प्रतिष्ठानचे काशीनाथ शेलार, समूह संस्थेचे मकरंद शेंडे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रा़ बाळासाहेब कोकरे, अनिरुद्ध ट्रस्टचे राजेंद्र बागुल, नगसेवक सचिन फरांदे, मुख्याधिकारी आशा राऊत यांचा सत्कार करण्यात आला़ कृष्णा स्वच्छतेसाठी तात्पुरते व कायस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून वाई शहर तसेच कृष्णाकाठावरील सर्व गावांच्या ग्रामस्थांच्या सहभागातून १० जुलैला स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. - डॉ. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारीकृष्णा नदीला दक्षिणेतील गंगा म्हणून संबोधले जाते कारण देशाचे ७० ब टक्के सिंचनाचे काम कृष्णेमधून होत़ ज्या पद्धतीने नमामी योजनेतून चंद्रभागाला विशेष निधी उपलब्ध करण्यात आला त्याप्रमाणे कृष्णेला ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. -खासदार उदयनराजे भोसले