राजीव मुळ्ये - सातारा ‘आमच्या’ बाल्कनीत ‘आम्ही’ लावलेल्या घरट्यात एक छानसा पक्षी येऊन राहिला आहे. ‘आम्ही’ दिलेलं ‘फूड’ तो खातो. खूपच ‘कलरफुल’ आहे.... क्लिक! गॅलरी... कॅमेरा... सिलेक्ट... व्हॉट््स अॅप... ग्रुप! ‘वॉव’... ‘आॅसम’... ‘क्यूट’... अंगठा... छान... इत्यादी, वगैरे! हल्ली व्हॉट्स अॅपवर सर्रास दिसणारं हे चित्र. माणसानं ‘बांधलेल्या’ घरट्यात पक्षी येऊन राहतात. देईल ते खातात. मातीच्या बाउलमधलं पाणी पितात आणि व्हॉट्स अॅपवरून फिरता-फिरता ‘सेलिब्रिटी’ बनतात. हा पशुपक्ष्यांच्या हिताचा विचार आहे का? नक्कीच! यामागची भावनाही अत्यंत शुद्ध, स्वच्छ आहे. परंतु ती ज्या साच्यामध्ये घातली जात आहे, तो दूरगामी विचार करता घातक असल्याचं पक्ष्यांच्या अभ्यासकांना वाटतं. पक्ष्यांचे ‘नैसर्गिक’ अधिवास हिरावून घेतल्यानंतर आपण त्यांना ‘आपल्यासारखं’ जगायची सवय लावतो आहोत.मोबाइल येण्यापूर्वी अनेक नंबर आपल्याला तोंडपाठ असायचे. नंतर सगळे नंबर मोबाइलला ‘सेव्ह’ झाले आणि आज आपल्याला काहीच आठवत नाही. असंच काहीसं प्रत्येक प्राणिप्रजातीचं होत असतं. काही वर्षांनी पक्षी घरट बांधण्याची कलाच विसरले तर?शहरात एकेकाळी मोठ्या संख्येनं दिसणाऱ्या चिमण्या आणि इतर पक्षी पुन्हा येऊन आपल्या घराच्या आसपास बागडावेत, त्यासाठी आपण काहीतरी करावं, असं वाटण्यात गैर काहीच नाही. पण, त्यासाठीचा मार्ग ‘कृत्रिम’ नसावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. मुळात पक्षी आपल्या घरापासून दूर का गेलेत, याचा अभ्यास करून त्या दृष्टीनं आपण स्वत: बदललं पाहिजे. मागच्या पिढ्यांनी जे नैसर्गिक शहाणपण दाखवलं, त्याचीच उजळणी करायची आहे. अंगण, वळचण, पॅरट होल, देवळी यापैकी कोणतीही गोष्ट आज शिल्लक नाही. वळचणीला आणि देवळीत घरटं बांधून पक्षी आरामात राहत होते. अंडी घालत होते. ‘पॅरट होल’ची संकल्पना तर केवळ अफलातून! एकाच वर्षात तीन वेगवेगळे पक्षी तिथं आपापल्या विणीच्या हंगामानुसार त्यात तळ ठोकून असायचे. अंगणात देशी झाडं होती. ती तर पक्ष्यांची लाडकी आश्रयस्थळं. हे सगळं लयाला जात असताना आपण ‘अपरिहार्य’ हा शब्द उच्चारून पाहत राहणार की थोडं स्वत:लाही बदलणार, हाच प्रश्न आहे. पक्षीप्रेमाचं व्यापारीकरणपक्ष्यांच्या प्रेमात पडणाऱ्यांना सध्या महागडी घरटी बाजारात तयार मिळतात. लाकडी असूनसुद्धा ती ‘इको फ्रेन्डली’ कशी काय, याचा उलगडा अनेकांना होत नाही. विविध धान्यांची संमिश्र भरड ‘पक्ष्यांचं खाद्य’ म्हणून विकत मिळते. त्यात काही वेळा ‘कद्रू’ म्हणजे गवताच्या बियाही मिसळल्या जातात. लाल मातीचे बाऊल पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी विकत मिळतात. असं सगळं ‘विकतचं’ पक्ष्यांना देऊन फोटो व्हॉट्स अॅपवर फिरवणं हा ‘स्टेटस सिंबल’ झालाय.हे व्हायला हवंएखाद्या सोसायटीच्या टेरेसवर सुतळ्या, काथ्या, काड्या, काटक्या, कापूस, चिंध्या, नारळाच्या शेंड्या अशा वस्तू जर पसरून ठेवल्या तर तो सोसायटीतला ‘कचरा’ ठरेल. परंतु जाणीवपूर्वक असं करणारे लोक आहेत. या वस्तू उचलून पक्षी आपले निवारे स्वत: बनवतात, हा त्यांचा अनुभव आहे. शहरात उरल्यासुरल्या पक्ष्यांना आपण ‘रेडिमेड’ घरटी दिली तर पक्षी घरटं कसं बांधतो, हे पुढच्या पिढीला कदाचित पाहायलाच मिळणार नाही. पक्षी हवे असतील तर...वड, पिंपळ, उंबर अशी स्थानिक झाडे जास्तीत जास्त लावाआवाजी फटाक्यांचा वापर कमीत कमी कराबांधकाम करताना देवळ्या, वळचणी, पॅरट हॉल बांधाडॉल्बीसारख्या कर्कश सिस्टिमचा वापर टाळा‘इव्हेन्ट’च्या वेळी रात्री आकाशात प्रकाशझोत टाकणे टाळा
पक्ष्यांना हवंय नैसर्गिक घरकुल!
By admin | Updated: June 5, 2015 00:12 IST