शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा नैवेद्य खाऊन उडून गेले कावळे

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

सुनील माने : रहिमतपूरच्या कार्यक्रमात येळगावकरांवर टीका

रहिमतपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वार्थासाठी आलेले निघून गेले, ते कावळे होते. कावळे आले आणि नैवेद्य खाऊन उडून गेले. आम्ही मात्र पक्षाचे सच्चे मावळे आहोत. त्यामुळे गेलेल्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोला पक्ष सोडून गेलेल्या दिलीप येळगावकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी लगावला. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब पाटील होते. पालकमंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आमदार सदाशिव पोळ, नितीन भरगुडे-पाटील, मानसिंगराव जगदाळे, सुनील खत्री, बाळासाहेब सोळस्कर, सुरेखा पाटील, जितेंद्र पवार, किशोर बाचल, शाहूराज फाळके, नगराध्यक्षा उज्ज्वला माने आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील माने म्हणाले, ‘काही लोक सत्तेसाठी राजकारण करीत आहेत. त्यांना वेळेतच रोखण्यासाठी निष्ठावान फळी निर्माण करणे गरजेचे आहे.’ पालकमंत्री शिंदे म्हणाले, ‘ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील काही विरोधक पाण्याच्या बाबतीत मुद्दाम चुकीचे राजकारण करीत आहेत. त्यांनी जनतेला विनाकारण भडकवू नये.’यावेळी मानसिंगराव जगदाळे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, सुनील खत्री यांची भाषणे झाली.यावेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सुनील माने यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, वसंतराव कदम, शाहूराज फाळके, दाजी पवार, कांतिलाल पाटील, अ‍ॅड. नितीन भोसले, अरुण माने, तानाजी शिंदे, अमित कदम, सुभाष नरळे, कविता गिरी, श्रीमंत झांजुर्णे, अ‍ॅड. अशोक पवार, आनंदा कोरे, शशिकांत भोसले, संभाजी माने, सुखदेव माने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रास्ताविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनीआभार मानले. (वार्ताहर)