शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वडूज, लोणंदमध्ये राष्ट्रवादीचाच झेंडा

By admin | Updated: August 23, 2015 23:50 IST

बाजार समिती निवडणूक : खंडाळा तालुक्यात सत्ता टिकवण्यात सत्ताधाऱ्यांना यश

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलने काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवित विजयी घोडदौड कायम राखली. राष्ट्रवादीने १८ पैकी १७ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसला व्यापारी मतदारसंघातील एका जागेवरच समाधान मानावे लागले. लोणंद बाजार समितीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल रिंगणात होते. चुरशीने झालेल्या मतदानातही राष्ट्रवादीने मोठ्या फरकाने विजय मिळवित तालुक्यावरील आपली पकड मजबूत केली. या निवडणुकीत सोसायटी गटात ६१८, ग्रामपंचायत गटात ५००, व्यापारी गटात ३३२ तर हमाल व मापाडी गटात १३८ मतदान झाले होते. राष्ट्रवादीप्रणित पॅनेलमधून सोसायटी गटातून नामदेव धायगुडे (३६९), आनंदराव वाघमोडे (३६७), सागर जाधव (३६०), उत्तम धायगुडे (३५२), शिवाजी मोरे (३४७), नारायण क्षीरसागर (३४३), भरत गाढवे (३३८), सुनील नेवसे (३८१), कमल पवार (३९०), आशा लिमण (३८५), हे विजयी झाले तर. ग्रामपंचायत गटातून अनंत तांबे (३३४), रमेश शिंदे (२७४), मनोज पवार (३१८), संगीता गायकवाड (३२२) यांनी विजय मिळविला. हमाल व मापाडी गटातून विश्वास शिरतोड (९६) हे विजयी झाले. व्यापारी गटातून बाळकृष्ण रासकर (१५१) हे यांनी विजय खेचून आणला तर व्यापारी गटातून काँग्रेसचे राहुल नागर (१६७) हे वैयक्तिक प्रभावामुळे निवडून आले. राष्ट्रवादीचे दत्तात्रय बिचुकले हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार मकरंद पाटील यांचा तालुक्यावरील प्रभाव या निवडणुकीत दिसून आला. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. मतमोजणीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर झालटे यांनी काम पाहिले तर चव्हाण यांनी सहायक अधिकारी म्हणून सहकार्य केले. (प्रतिनिधी)