शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने योजना रखडविली

By admin | Updated: January 26, 2015 00:45 IST

जयकुमार गोरेंचा प्रतिटोला : अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी मुक्ताफळे उधळू नयेत

म्हसवड : गेली पंधरा वर्षे कृष्णा खोरेचे अध्यक्षपद आणि मंत्रिपद असूनही राष्ट्रवादीला जिहे-कठापूर योजनेची सुप्रमा मिळविता आली नाही. ज्यांनी जिहे-कठापूर योजना रखडविण्याचे पाप केले, ज्यांना वास्तव माहीत नाही त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी मुक्ताफळे उधळू नयेत, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.बोराटवाडी, ता. माण येथे पत्रकारांशी ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यापासून जिहे-कठापूर योजनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही योजना आजपर्यंत का झाली नाही याबद्दल काही राजकीय विश्लेषक, स्वत:ला जिहे-कठापूरचे प्रणेते समजणारे, ज्यांना जिहे कुठे आणि कठापूर कुठे हे माहीत नाही, असे अनेक उपद्व्यापी याविषयी मते मांडू लागले आहेत. काही जण योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देऊ लागले आहेत. पालकमंत्र्यांनी ही योजना दोन वर्षात मार्गी लावू, अशी भूमिका मांडली आहे. अगदी असेच मत गेल्या वर्षी पालकमंत्री झालेल्यांनी व्यक्त केले होते. त्यांनी तर एक वर्षात पाणी आणण्याचा शब्द दिला होता. त्यांची ती भूमिका आततायीपणाचे लक्षण होते, असे आ. गोरे म्हणाले. खरे पाप रामराजेंचे...अर्थ खाते अजितदादांकडे आहे. वित्त विभागातून जिहे-कठापूरची फाईल मार्गी लावून आणा. मुख्यमंत्र्यांकडून सुप्रमा घ्यायची जबाबदारी माझी आहे, अशी भूमिका मी त्यांच्याकडे मांडली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही अर्थ खात्याकडून योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आलीच नव्हती. ही योजना रखडविण्याचे खरे पाप खात्याचा कारभार अध्यक्ष व मंत्री म्हणून पंधरा वर्षे सांभाळणाऱ्या रामराजेंचे आहे, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.