शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रवादी नगरसेवकांचा सुशांत निंबाळकरांवर हल्ला

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

फलटण : नेत्यांंविरोधात बोलतो म्हणून घरासह गाडीचीही तोडफोड

फलटण : ‘साताऱ्यामधील आॅनलाईन वृत्तपत्रात बातमी का दिली, फलटणमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात का बोलतोस,’ या कारणावरून चिडून जाऊन ‘राष्ट्रवादी युवक’चे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना मारहाण करून जखमी केले. तसेच गाडी व घराचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह दहा ते बाराजणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, सुशांत निंबाळकर हे आज, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कुटुंबीयांसमवेत विद्यानगर येथील घरी होते. यावेळी दोन नगरसेवक सनी संजय अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) व गुड्ड्या ऊर्फ किशोर धनराज पवार (रा. बुरुड गल्ली, फलटण) यांच्यासह सलीम शेख (रा. पाचबत्ती चौक, फलटण), अभिजित बाळासाहेब जानकर (रा. शुक्रवार पेठ), राजू बोके (रा. मंगळवार पेठ), सिद्धार्थ अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) व आणखी दहा ते बाराजण घरात आले. ‘फलटण विधानसभा मतदारसंघात आता तिसरा पर्याय’ या शीर्षकाखाली सातारा येथील एका आॅनलाईन वृत्तपत्रास तू बातमी का दिलीस, फलटण येथील ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांविरोधात भडक का बोलतोस, तुझ्याकडे बघून घेतो, बंगल्यावर नेऊन तुला चिरतो,’ असे म्हणत शिवीगाळ करीत या नगरसेवकांनी मारहाण केली. या हल्ल्यात सुशांत निंबाळकर यांच्या डोक्याला इजा झाली असून, हल्लेखोर फरार आहेत. त्यांच्याविरोधात भादंविस कलम १४३, ७७, ४५२, २३३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)आई-वडिलांनाही मारहाण हल्लेखोरांनी घरातील लहान मुलाची सायकल फेकून सुशांत यांना जखमी केले. या मारहाणीत निंबाळकर यांचे ब्रेसलेटही गहाळ झाले. मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या आई-वडील व पत्नीलाही मारहाण केली, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.