शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीची खलबते

By admin | Updated: August 31, 2014 00:20 IST

प्रचाराला बोलवा, मी हजर : जयंतराव म्हणे... काका, मैं हूं ना !

कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणची संभाव्य उमेदवारी सध्या भलतीच चर्चेत आहे़ पण मुख्यमंत्र्यांना होमपीचवरच खिळवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खलबते सुरू केली आहेत़ म्हणूनच की काय, या आठवड्यात पालकमंत्री शशिकांत शिंदे, ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांचे दक्षिणेत जाहीर कर्यक्रम अन् उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा दक्षिण राष्ट्रवादीचा मेळावा झाल्याचे मानले जाते़ पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिल्यापासून हा मतदारसंघ चांगलाच ‘हॉट’ बनला आहे़ अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे़ मुख्यमंत्र्यांना दक्षिणेतच खिळवून ठेवण्यासाठी भाजप नेत्यांनीही खेळ्या सुरू केल्या आहेत़ मुख्यमंत्री उभे राहिले तर जशास तसा उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा भाजप नेते खासगीत दावा करत आहेत़ पण, यात मित्रपक्ष राष्ट्रवादीही कुठे मागे दिसत नाही़ ओंड येथे अ‍ॅड़ दीपक थोरात यांनी आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभाला पालकमंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते़ राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती़ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मेळात दिसणारे भीमराव पाटील सध्या बंडखोरीच्या पवित्र्यात असणाऱ्या अतुल भोसलेंच्या गटात घुसले आहेत़ भोसलेंच्या व्यासपीठावरून थेट मुख्यमंत्र्यांच्यावर निशाणा साधणारे भीमराव पाटील राष्ट्रवादीचे मंत्री शशिकांत शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसल्याने त्यांची उलट-सुलट चर्चा सुरू आहे़ रेठरे खुर्द येथे पाटबंधारे विभागाच्या भूमिपूजन समांरभास ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील व दक्षिणचे आमदार विलासराव पाटील यांचा संयुक्त कार्यक्रम झाला़ या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कोणीच उपस्थित नव्हते; पण या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी ‘विलासकाका उंडाळकर यांची पाठराखण करा,’ असे आवाहन तर केलेच; पण ‘माझा अन् काकांचा पक्ष वेगळा आहे़त्यामुळे मी त्यांना उमेदवारी देऊ शकत नाही; पण काका मला प्रचाराला बोलवा, मी नक्की येईन,’ असे सांगून विलासराव पाटील उंडाळकरांना बळ देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कळच काढल्याचे मानले जाते़ (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्णय नाहीउत्तरेचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी नुकताच कऱ्हाड दक्षिणच्या राष्ट्रवादीचा मेळावा घेतला; पण त्यांना अजून दक्षिण मतदारसंघाचा मेळ घालता आलेला दिसत नाही़ कारण त्यांचं भाषण कऱ्हाड शहरासह दक्षिणेत समाविष्ट झालेल्या त्या १३ गावांभोवतीच फिरत होते़ अन् ‘तिसरा पर्याय देण्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांनीच दक्षिणेतील इतर गावातील लोकांशी चर्चा करावी,’ असं सांगत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू टाकला़ त्यामुळे दक्षिणेवर स्वारी करण्याबाबतचा निर्णय झालाच नाही़