शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे गटाने संतोष जाधव यांच्या भाजपा पॅनेलला चारी मुंड्या चित केले. सोनगाव अन् जकातवाडी उदयनराजे गटाकडे तर आसनगाव अन् .... सह बरीच गावे शिवेंद्रसिंहराजे गटाकडे गेली आहेत.कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी, काँगे्रसने आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या गटाला पराभवाचा जोरदार धक्का बसला. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवूनहीसरपंचपद गमावले. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपाकडे गेली असून, भुर्इंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे, तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहिले.भाजपाचा ५५ गावांत सत्ता आल्याचा दावासातारा जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये भाजपची सत्ता आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेली अनेक दशके राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाºया राजकीय बालेकिल्ल्याला भाजपाने हादरा दिला असून, मोदी अन् फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासाचाच हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी व्यक्त केली.वाईत धक्कादायक निकालवाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी या ग्रामपंचायतीं-मध्ये वीस ते पंचवीस वर्षांची एकाधिकारशाही मोडीत निघत धक्कादायक निकाल हाती लागले.कोरेगावात भाजपाने उघडले खातेग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने अखेर कोरेगाव तालुक्यात खाते उघडले असून, सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. जळगावमध्ये मात्र ‘गड आला पण सिंह गेला,’ अशी अवस्था भाजपाची झाली. राष्टÑवादी काँग्रेसने काँग्रेसच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या असून, एकंबे व कुमठे ग्रामपंचायतीदेखील आता राष्टÑवादीकडे गेल्या आहेत.गिरवीत ‘काँग्रेस’ला धक्काफलटणमध्ये गिरवी ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यातून गेली. राजेगट व मित्रपक्ष मिळून १८, तर कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. शिरवळ खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाºयांना नीरा नदीचा घाट दाखविला.