शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगासाठी नैसर्गिक संपत्तीचा गळा घोटला !

By admin | Updated: June 20, 2016 00:30 IST

खंडाळा तालुका : पर्यावरणाचा ऱ्हास; औद्योगिकीकरणाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड, टेकड्या उद्ध्वस्त

 खंडाळा : खंडाळा तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय विस्तारीत झालेला आहे. मात्र या उद्योग उभारणीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा व पर्यावरणाचा गळा घोटला जात असल्याचे विदारक चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नव्या औद्योगिक धोरणानुसार महामार्गालगत आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा तालुक्याला कारखानदारांनी पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे शेकडो कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. तर अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत. कंपनी उभारण्यासाठी घेतलेल्या जमीन क्षेत्रातील सपाटीकरण करताना वृक्षसंपदेला कुऱ्हाडीचा घाव घातला जातोय. नैसर्गिक टेकड्या बेमालूमपणे भुईसपाट केल्या जात आहे. एवढेच नव्हे तर नैसर्गिक ओढे -नाले सुद्धा नेस्तनाबूत होत आहेत. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसणार आहे. कंपन्यांनी ओढ्यातूनच कंपाऊंड बांधून त्याखालून ओढ्याचे पाणी काढून दिले आहे. ऐन पावसाळ्यात येणारे पाणी ओढा पात्र संपुष्टात आल्याने शेतीपिकातून जाण्याची भीती आहे. अनेक कंपनी मालकांनी अधिग्रहण केलेल्या जमिनीमध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली टेकड्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तर प्रचंड प्रमाणात वृक्षतोडही केली आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक करून गांधारीची भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळते. वास्तविक नव्या धोरणानुसार कंपनी उभारताना घेतलेल्या जमिनीत सुमारे ३३ टक्के भागावर वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. परंतु दिवसा ढवळ्या प्रशासनादेखत कायदाही बासनात गुंडाळून मागेपुढे पाहिले जात नाही. तरीही प्रशासन गप्प का ? अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. एरव्ही शेतकऱ्यांने स्वत:च्या जमिनीत माती उकरली तरी दंड करणारे महसूल प्रशासनाची कंपन्यांबाबत ही भूमिका कशासाठी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी) खंडाळा तालुक्यात उद्योग वाढत आहेत. ही बाब चांगली असली तरी त्याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य नाही. कायद्याचे पालन करून कंपन्यांनी कामे केली पाहिजेत. यावर प्रशासन लक्ष देणार नसेल तर समाजहित जोपासणारा पक्ष म्हणून शिवसेना त्यावर आवाज उठवेल. - अजित यादव, तालुकाप्रमुख, युवा शिवसेना खंडाळा कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जोपासली पाहिज. नैसर्गिक प्रवाह बंद करून शेतकऱ्यांवर घाला घालू नये. तालुक्यातील सर्व कंपन्यांनी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. - संतोष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते