शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात राष्ट्रवादीने पाळला आघाडी धर्म

By admin | Updated: March 14, 2017 22:49 IST

सभापतिपदी राष्ट्रवादीचे मकरंद मोटे : उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या वंदना धायगुडे यांची निवड

खंडाळा : खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करीत सत्ता स्थापन केली. सभापतिपदी राष्ट्रवादीचे मारुती ऊर्फ मकरंद मोटे तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी आ. मकरंद पाटील यांनी घालून आपला दबदबा कायम राखला.खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मकरंद मोटे, अश्विनी पवार आणि राजेंद्र तांबे असे तीन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज होती. वास्तविक, राष्ट्रवादी पुढे शोभा जाधव आणि चंद्रकांत यादव या दोन्ही अपक्षांचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, आमदार मकरंद पाटील यांनी काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय घेऊन निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळला.खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात आज राष्ट्रवादीचे तीन सदस्य व काँग्रेसचे एक सदस्य यांनी चौघांनी एकत्रित येऊन सभापतिपदासाठी नायगाव गणातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे मकरंद मोटे तर उपसभापतिपदासाठी खेड गणातून काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांचे अर्ज दाखल केले. पुरेसे संख्याबळ नसल्याने चंद्रकांत यादव यांना उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे दोन्ही अपक्ष तटस्थ राहिले.गेली पंचवीस वर्षे धनगरवाडी गावचे सरपंच असलेले मकरंद मोटे यांना पहिल्याच प्रयत्नात सभापतिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पदाधिकारी निवडीवेळी तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दीपाली साळुंखे, उदय कबुले, अ‍ॅड . शामराव गाढवे, लताताई नरुटे, बंडा साळुंखे, राजेंद्र चव्हाण, अजय भोसले, अजय धायगुडे, नामदेवराव धायगुडे, दत्तात्रय बिचुकले, संभाजी घाडगे, चंद्रकांत पाचे, सुभाषराव भोसले, गुरुदेव बरदाडे उपस्थित होते. नूतन सभापती व उपसभापती यांना निवडणूक अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)