शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी-भाजप’ युतीमुळे कलाटणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:52 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी भाजपशी मिळते-जुळते घेत भाजपशी घरोबा करुन जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आपले संख्याबळ वाढविले. निवडणुकीतील ४0 पैकी तब्बल ३0 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविणारा राष्ट्रवादी नियोजन समितीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सात जागांसाठी भाजपने राष्ट्रवादीला सहकार्य करायचे, ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी भाजपशी मिळते-जुळते घेत भाजपशी घरोबा करुन जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आपले संख्याबळ वाढविले. निवडणुकीतील ४0 पैकी तब्बल ३0 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविणारा राष्ट्रवादी नियोजन समितीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सात जागांसाठी भाजपने राष्ट्रवादीला सहकार्य करायचे, त्याबदल्यात भाजपला जिल्हा परिषद मतदारसंघातील तीन जागा देण्याचा अलिखित करार झाला होता. जिल्ह्यासाठी हे समीकरण नवे असले तरीही काँगे्रससह, खासदार उदयनराजे भोसले, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा वारु रोखण्याच्या दृष्टिने ते महत्त्वाचे पाऊल ठरले. राष्ट्रवादीला विरोध करणाºया सातारा विकास आघाडी व शिवसेना या दोन पक्षांचे अक्षरश: पानिपत झाले. सातारा विकास आघाडीने नगरपालिका मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, हे प्रयत्न पूर्णत: धुळीला मिळाले. विरोधकांची मोट एकसंध राहिली नसल्याने विरोधकांचे शहरात असणारे वर्चस्वही त्यांच्यासाठी उपयोगी ठरले नाही. तर नगरपालिकांमध्ये असणारे भाजपचे बळ राष्ट्रवादीला मिळून नगरपंचायती व नगरपालिका मतदारसंघांवर राष्ट्रवादीने प्राबल्य मिळविले.नगरपालिका मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक विनोद उर्फ बाळू खंदारे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. या विजयानेच राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केलेल्या सोयरिकीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समोर आले. ‘लोकमत’ने या पूर्वीच मांडलेल्या अंदाजानुसार जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या रेश्मा शिंदे, मनोज घोरपडे, सुवर्णा देसाई यांना मदत करून राष्ट्रवादीने नगरपंचायत व नगरपालिका हे अख्खे दोन मतदारसंघ आपल्या खिशात टाकले.विजयानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: जल्लोष केला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीदेखील करण्यात आले. शहरात जागोजागी गुलालाचा खच साठलेला पाहायला मिळत होता.१९९९ पासून जिल्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीला आजवर काही प्रमाणात आव्हान उभे करीत आलेल्या काँग्रेसपाठोपाठ आता जिल्ह्यात भाजपही बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्यास सुरूवात केल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ठळकपणे दिसून आले.चोरगेंचा विजयी जल्लोष पण... साळुंखेंच्या हाती नियुक्तीपत्रसमसमान मते मिळालेल्या साविआच्या अनिता चोरगे व दीपाली साळुंखे यांच्यातील जेतेपदाची अनोखी रस्सीखेच मतमोजणीवेळी पाहायला मिळाली. पहिल्या मतमोजणीत दोघींना समान मते मिळाल्याने लॉटरी (चिठ्ठी) चा कौल चोरगे यांच्या बाजूने लागला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह विजयी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलालही उधळला.मात्र, राष्ट्रवादीने या विजयावर हरकत घेतल्याने पुनर्रमतमोजणी करण्यात आली. त्यात पराभूत ठरविलेल्या दीपाली साळुंखे विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्यांच्या विजयाची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. चोरगेंच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आनंद काही काळापुरताच ठरला....अन भादेतून गाडीपुन्हा माघारी फिरली!पराभूत झाल्याची सल मनात धरून दीपाली साळुंखे व त्यांचे कार्यकर्ते आलेल्या वाहनातून परत खंडाळा तालुक्यातील त्यांच्या भादे गावाकडे परतले; परंतु, घरात पोहोचतायत तोच त्यांना राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांचा फोन आला. ‘अहो, निकालानंतर तुम्ही परत कशा गेलात...परत निघा निकालावर हरकत घ्यायची आहे, आम्ही सर्व प्रोसेस केली आहे, तुम्ही तत्काळ निघा...’, असा निरोप मिळताच दीपाली साळुंखे पुन्हा साताºयात दाखल झाल्या. फेरमतमोजणीचा कौल त्यांच्या बाजूने लागल्याने रुसलेले कार्यकर्त्यांच्या चेहºयावर क्षणार्धात हसू फुलले.घोरपडे-देशमुखांचीअनोखी हॅटट्रिकभाजपचे मनोज घोरपडे हे जिल्हा नियोजनवर निवडून आले. त्याआधी त्यांचे वडील भीमराव घोरपडे व आई मंगला घोरपडे हेही जिल्हा नियोजनचे सदस्य होते. तर सातारा विकास आघाडीच्या अर्चना देशमुख या आधी सरपंच म्हणून दुसºया जिल्हा परिषद सदस्या म्हणून तर आता जिल्हा नियोजन समिती सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. घोरपडे व देशमुख यांच्या हॅटट्रिकची निकालानंतर चांगलीच चर्चा रंगली होती.