शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज छाननीत राष्ट्रवादीला फटका..

By admin | Updated: March 25, 2016 00:04 IST

लोणंद नगरपंचायत निवडणूक : १७ जागांसाठी १०६ जण रिंगणात; सर्वच पक्षांनी लावली ताकद पणाला--लोणंदचं रणकंदन

लोणंद : लोणंद नगरपंचायतीची पहिली पंचवार्षिक निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज छाननीमध्ये १९ अर्ज बाद झाले आहेत. आता १७ जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, अर्ज छाननीमध्ये माजी सरपंच व विद्यमान सदस्या नंदाताई गायकवाड, दादासाहेब ठोंबरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लोणंद नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. एप्रिल महिन्यात नगपंचायतीसाठी प्रथमच मतदान होत आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बुधवारी अर्ज छाननी झाली. ११७ उमेदवारांनी १३९ अर्ज दाखल केले होते. या छाननीत १९ अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये दुबार अर्ज १४ असल्याने १७ जागांसाठी आता १०६ उमेदवार रिंगणात असल्याचे सध्यातरी दिसत आहे. या निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून राजेंद्र क्षीरसागर यांनी सर्व प्रभागातील उमेदवारांना बोलावून अर्जाची शहानिशा करून निर्णय दिला. माजी सरपंच व विद्यमान सदस्या नंदाताई गायकवाड, दादासाहेब ठोंबरे यांच्यासह जयश्री गुंडगे असे मिळून राष्ट्रवादीच्या तिघांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्याचबरोबर प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जमातीचा राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करून राष्ट्रवादीला १७ जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. लोणंद नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दिवसेंदिवस येथील राजकीय वातावरण तापत आहे. ग्रामपंचायतीनंतर अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत निवडणुकीत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. येथील निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. (वार्ताहर)