शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:22 IST

प्रगती जाधव-पाटील । सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते शिरवळ रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ...

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते शिरवळ रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेबरोबरच सोयीही उपलब्ध करून देऊ, असे स्पष्टीकरण रिलायन्सचे आपत्कालीन विभाग महामार्ग अधिकारी संकेत गांधी यांनी केले आहे.महामार्गावरील असुविधांबरोबरच त्रुटींबाबत ‘लोकमत’ने ‘असुविधांचा महामार्ग’ अशी वृत्तमालिका सुरू केली होती. खेडशिवापूर ते हुबळी या महामार्गावरील उपलब्ध सोयींबरोबरच सत्यस्थिती मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने स्पष्टीकरण करण्यात आले आहे.गांधी म्हणाले, ‘महामार्गावर प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणं हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे; पण यंदाच्या उच्चांकी पावसाने रस्ता खूपच खराब झाला. पाऊस सुरू असतानाच अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये आम्ही पेव्हर टाकून तात्पुरती दुरुस्ती केली आहे. शिरवळ ते शेंद्रे या ७० किलोमीटरच्या महामार्गावर एकही खड्डा दिसणार नाही, अशा पद्धतीने पॅचिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका, क्रेन, पेट्रोलिंग गाडी यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याद्वारेही प्रवाशांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्याची नोंद उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, तिथं पेव्हर टाकून पॅचिंग करण्यात आले होते. आता या खड्ड्यातील पेव्हर काढून त्यात डांबर टाकून या रस्त्यांचे ‘मिलिंग’ करण्यात येणार आहे. हे काम वेळ खाऊ असल्यामुळे ते पूर्ण व्हायला थोडा अवधी लागू शकतो; पण सुरक्षित प्रवासासाठी हे तितकेच उपयुक्तही आहे. महामार्गावर कुठंही खड्डे दिसणार नाहीत, याची खबरदारी आम्ही घेणार आहे.पावसामुळे महामार्गावर पेव्हर पॅचिंग!यंदा उच्चांकी पाऊस झाला. परिणामी रस्त्यांची दुर्दशा झाली. कोसळत्या पावसात अपघात टाळण्यासाठी ऐनवेळीची तरतूद म्हणून महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हरचे पॅचिंग करण्यात आले. ज्या खड्ड्यांमध्ये पेव्हर आहेत, त्यात पुन्हा डांबर टाकून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती ‘रिलायन्स’चे देखभाल दुरुस्तीचे अधिकारी संजयकुमार सिंग यांनी दिली.अल्टिमेटम गाठणारच !साताºयाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत पुण्यात झालेल्या बैठकीत आम्ही डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानुसार आमची कार्यवाही सुरू झाली आहे. ५० कामगारांच्या साथीने शेंद्रे ते शिरवळ रस्त्याचे काम सुरू आहे.