शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नथुरामाचे उदात्तीकरण नको

By admin | Updated: December 29, 2014 23:53 IST

स्वातंत्र्यसैनिकांचा सत्याग्रह : कऱ्हाडच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध

कऱ्हाड : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या काही वृत्तींचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या निषेधार्थ येथील कोल्हापूर नाक्यानजीक महात्मा गांधी पुतळा परिसरात सोमवारी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले़ यावेळी महात्मा गांधी यांची हत्या कणाऱ्याचे गौरवीकरण नको, अशी मागणी करण्यात आली़ उत्तर प्रदेशात नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याचा घाट काही प्रवृत्तींनी घातला आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १९४२ च्या चले जाव आंदोलनात, प्रतिसरकार लढ्यात, तसेच मिठाचा सत्याग्रह, गोवा मुक्ती संग्राम, भूमिगत चळवळ अशा लढ्यांतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, अशा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांकडून या प्रवृत्तींचा धिक्कार करण्यात आला. आंदोलनास ३५ हून अधिक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी हजेरी लावली होती़ दरम्यान, यापुढेही असाच लढा चालू ठेवून देशविघातक शक्तींविरोधात नेहमीच अहिंसेच्या मार्गाने आपली भूमिका मांडू, असे मत स्वातंत्र्यसेनानी भाई पंजाबराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले़ यावेळी प्रतिसरकार स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी डी़ एम़ पाटील, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक कल्याण सुकाणू समितीचे पंजाबराव फाळके, विजय देशापांडे, महात्मा गांधी स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी अण्णा सापते, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे अस्लम तडसरकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुलाबराव ढमाळे, नारायण पाटील, वसंत पारवे, जालिंदर पाटील, कॉ़ डी़ एस़ पाटील, भानुदास पाटील, हणमंत थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)९६ व्या वर्षीही सत्याग्रहात सहभागीक्रांतिसिंह नाना पाटील, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिवीर किसन वीर, जी़ डी़ बापू लाड यांच्याबरोबर काम केलेले, चलेजाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह, प्रतिसरकार आंदोलन, भूमिगत लढ्यामध्ये सहभाग घेतलेले, राष्ट्रपतीपदक प्राप्त सोपानराव घोरपडे (रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव) यांनी ९६ व्या वर्षीही त्यांच्यातील स्वातंत्र्यसैनिक जागा ठेवून या सत्याग्रहात सहभाग घेतला़