शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

राजाच्या समाधीने गावाचे नाव झाले राजापूर

By admin | Updated: April 3, 2015 00:43 IST

घाटगे सरदार घराणे संस्थानिक : अंबोजीराजे घाटगे यांनी वसवले गाव

विशाल सूर्यवंशी -बुध बुधपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या राजापूरचा नावातच त्याचा इतिहास दडला आहे. बुध गाव हे संस्थानिक गाव घाटगे या सरदर घराण्याचा अठराव्या शतकात मोठ्या प्रमाणात दबदबा होता़ महादजी शिंदे यांच्या बरोबरीने आपला पराक्रम दाखवणारे राजे अंबोजीराजे घाटगे यांनी आपल्या निवृत्तीच्या काळात राजापूर हे गाव वसवले अंबोजीराजे यांच्या निधनानंतर त्यांना जानुबाईच्या मंदिर परिसरात दफन केले. ही जागा म्हणजेच आजचे खटाव तालुक्यातील राजापूर.अंबोजीराजेंनी तीन एकरात भव्य असा तीन मजली राजवाडा बांधला परिसरातील जंगल तोडून मोठ्या प्रमाणात शेती पिकवण्यासाठी जमीन तयार केली, ही जमीन कसण्याठी माळी समाजातील कुटंबे आणून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. आजही मोठ्या प्रमाणात राजापूरला माळी समाज पाहायला मिळतोय. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला माळी समाज आज समृद्ध आहे, शेतीची राखण करण्यासाठी काटक रामोशी समाज दिमतीला असत. हा रामोशी समाज आजही या ठिकाणी पाहायाला मिळतोय. अनेक शिवारं या ठिकाणी आजही पाहयाला मिळत आहेमहादेव दरा,जरांबी, खुरीचा, नवामळा, डंगार वाडा यासारख्या अनेक शिवार, वस्त्या पाहायाला मिळत आहे.अंबोजीराजेंनी पाण्याच्या चार विहिरी कढल्या अत्यंत उत्कष्ट बांधणीचा नमुना असलेल्या विहिरी आजही सुस्थितीत आहेत, राजवाड्यासमोर ग्रामदैवत जानुबाईचे प्रचंड असे काळ््या पाषाणातील मंदिर आजही त्या काळाची भव्यता सांगत अखंडपणे उभे आहे. आपले कर्तृत्व करून ज्यावेळी अंबोजीराजेंचे निधन झाले. त्यावेळी त्यांना जानुबाई मंदिर परिसरात त्यांना दफन करण्यात आले व त्यावर समाधी बांधली; पण त्याकाळातील ‘राजाला पुरले’ असेच या भागाला संबोधित असत; पण कालांतरांना ‘राजाला पुरले’ चे राजापूर झाले. माळी, रामोशी कोष्टी, मराठा असे अनेक समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.अंबोजीराजेंचा राजवाडा अजूनही सुस्थितीत असून आतील बांधकाम ढासळल्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे .