शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चलती का नाम ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल’

By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST

कऱ्हाडात घनशाघोळ : परवाना नसतानाही प्रशिक्षण; ‘परिवहन’च्या डोळ्यावर झापड--लोकमत विशेष...

कऱ्हाड : चारचाकी घरच्या घरीही शिकता येते; पण योग्य प्रशिक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेकजण ‘ड्रायव्हिंग स्कूल’ला पसंती देतात. असे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक स्कूलही कार्यरत आहेत. मात्र, कऱ्हाडातील काही ‘ड्रायव्हिंग स्कूल’ला परवानाच नसल्याची माहिती उजेडात येत आहे. परवाना रद्द झाला असताना अथवा त्याचे नूतनीकरण केलेले नसतानाही अनेकजण असे बेकायदा ड्रायव्हिंग स्कूल चालवतायत. काही वर्षांपूर्वी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होती. शहरी भागातच अशा संस्था कार्यरत होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारे ‘ड्रायव्हिंग स्कूल’ अगदी गल्लीबोळातही सुरू झालेत. एकट्या कऱ्हाड शहरात अशा आठ-दहा संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थांकडे प्रवेश घेतलेल्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. कार, जीप, ट्रक यासह अन्य वाहने चालविण्याचे प्रशिक्षण या स्कूलमधून दिले जाते. त्यातही वेगवेगळ्या कंपनीच्या कार व जीप चालकास चालविण्यास शिकविल्या जातात. त्यासाठी संबंधित संस्थांकडेही अनेक कार व जीप उपलब्ध आहेत. स्कूलमधून प्रशिक्षण घेणे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असल्यामुळे अनेकजण अशा स्कूलमध्ये फी भरून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतात. संबंधित स्कूलमधून वाहन चालविण्याचा परवानाही मिळवून दिला जातो. कऱ्हाडातील काही ‘ड्रायव्हिंग स्कूल’चा कारभार यापूर्वी वारंवार चव्हाट्यावर आला आहे. प्रशिक्षण देताना काही स्कूलच्या गाड्या गर्दीच्या ठिकाणीच बंद पडल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात असताना वाहतुकीची कोंडी होण्यासारखे प्रकार घडतात. मुख्य रस्त्यांवरच चालकांना प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे इतर वाहनचालकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या स्कूलवाल्यांचा आणखी एक प्रताप चव्हाट्यावर आलाय. परवाना नसतानाही त्यांच्याकडून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. परवाना नसतानाही संबंधित स्कूलची वाहने रस्त्यावरून धावताना दिसतात. (प्रतिनिधी)एकाचा परवाना रद्दबेकायदा ड्रायव्हिंग स्कूल सुरू असल्याबाबत परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता कऱ्हाडातील ‘पवार ड्रायव्हिंग स्कूल’चा परवाना रद्द केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन परवान्याबाबत त्यांची कार्यवाही सुरू होती. मात्र, अद्याप आमच्या कार्यालयाकडे त्याबाबत कसलाही अर्ज आला नसल्याचे परिवहन अधिकारी नीळकंठ पाटील यांनी सांगितले. ‘परिवहन’कडून मिळतो परवाना१ अर्जदार किंवा संबंधित स्कूलला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आॅटोमोबाईल इंजिनिअर असणे आवश्यक असते.२ सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तसा प्रस्ताव परिवहन कार्यालयाकडे सादर केला जातो. परिवहनच्या स्थानिक कार्यालयाने प्रस्तावाची शहानिशा केल्यानंतर तो मंजुरीसाठी कोल्हापूरला पाठविला जातो. ३ परवान्याचे एक अथवा तीन वर्षांनंतर नूतनीकरणही करावे लागते. ४ त्याठिकाणी अर्जदाराला पाच हजार रुपये फी भरावी लागते. त्यानंतर स्कूलसाठीचा परवाना दिला जातो. ५ ड्रायव्हिंग स्कूल सुरू करावयाचे असल्यास त्यासाठी परिवहन विभागाचा परवाना आवश्यक असतो. परवान्यासाठी अर्जदाराची स्वत:ची अथवा भाडेतत्त्वावरील जागा असणे गरजेचे असते.