शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणेच्या नावाखाली उद्यानात अवैधरीत्या वृक्षतोड...

By admin | Updated: December 22, 2016 23:17 IST

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : वाई नगरपालिकेकडून सोनगिरवाडीत प्रकार; २५ वर्षांपूर्वीची झाडे, वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त

वाई : येथील सोनगिरवाडी उद्यानातील जवळपास २५ वर्षे जुनी असणारी झाडे नगरपालिकेने तोडली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुधारणेच्या नावाखाली झालेल्या अवैध वृक्षतोडीप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. येथील सोनगिरवाडीतील उद्यान समस्येच्या विळख्यात आहे. मुलांना खेळण्यासाठी उद्यानात ठेवण्यात आलेली खेळणी पूर्णपणे गंजलेली असून, त्याकडे मात्र पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पालिकेने या बागेत सुधारणेच्या नावाखाली जवळपास २५ वर्षे जुनी अशोक व गुलमोहराची नऊ झाडे कुणाचीही परवानगी न घेता अवैधपणे तोडली आहेत. वास्तविक पालिकेने जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचे पालिका प्रशासन समर्थन करीत असून, सोनगिरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाच्या आहेत म्हणून ही वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जी बाग अवैध धंद्याची केंद्रबिंदू आहे. अनेक तळीराम या ठिकाणी राजरोसपणे असतात. याकडे पालिकेचे कसलेही लक्ष नाही. वृक्षसंवर्धनाचा कर वसूल करणारी पालिका अतिशय जुनी परंतु सुस्थितीत असलेली झाडे बेपर्वाईने तोडण्यात धन्यता मानत आहे याचा वाईतील वृक्षप्रेमींनी निषेध केला आहे.निवेदनात म्हटले आहे की, पालिका प्रशासनाने बागेत सुधारणा करण्यासाठी झाडांची कत्तल करण्याची खरच गरज आहे का?, असा प्रश्न वाईकर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ज्या नाना-नानी पार्कचे काम गेले कित्येक वर्ष झाले चालू आहे. त्या कामाला गती देण्याचे पालिका प्रशासनाला आजतागायत जमले नाही. जी झाडे चांगल्या स्थितीत आहेत त्यांची मात्र सुधारणेच्या नावाखाली राजरोसपणे कत्तल करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे याआधी अनेक वेळा सत्ताधारी लोकप्रतिनिधी बदनाम झाले आहेत. पालिकेची प्रशासन इमारत प्रशस्त असली तरी पालिकेचे काम मात्र अशोभनीय आहे. तरी पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन चालू असलेली बेसुमार वृक्षतोड त्वरित थांबवून पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबवावे. आधी वृक्षारोपणाचा विचार व्हावा मगच वृक्षतोड करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पालिकेला खरेच सोनगिरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाची असल्यास सर्वात प्रथम वाई शहरातील इतर उद्यानाची स्थिती सुधारावी आणि मगच या उद्यानाच्या सुधारणेचा विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कृष्णाई फोरमचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी, अ‍ॅड. रफिक शेख, प्रशांत डोंगरे, तेजपाल वाघ, दिलीप डोंबीवलीकर, एन. डी. पाटील यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)