शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाचा छळ

By admin | Updated: August 7, 2016 22:55 IST

वाईत अघोरी प्रकार : कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे नागाची सुटका; वनकर्मचाऱ्यांनी तोडले टाके

वाई : नागपंचमी सणाला एक वेगळे महत्त्व आहे. या सणाला नागदेवतेची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. पण काही वेळा उत्सवात या प्राण्यांवर अत्याचार होण्याचे प्रकार घडत असतात. असाच अघोरी प्रकार वाई येथे घडला. नागपंचमीच्या मुहूर्तावर दुधाच्या अभिषेकाने भिजू पाहणारा नाग सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विसावला. सुई-दोऱ्याने नागाचे तोंड शिवून त्याला टोपलीत बंद करण्यात आले होते. वनविभागाने टाके तोडून नागाचे तोंड मोकळे केले. वाई येथील गंगापुरी भागात नागांना दूध पाजण्याच्या निमित्ताने दोन गारुडी महिलांकडून पैसे घेत असल्याची कुणकुण लागताच काही सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी बंदिस्त टोपली उघडून बघितली तेव्हा त्यात जिवंत नाग आढळून आला. समोरच्याला चावण्यासाठी तोंड उघडता येऊ नये म्हणून त्याचे तोंड दोन्ही बाजूने शिवण्यात आले होते. हा विकृत प्रकार पाहून कार्यकर्त्यांनी लगेच वनखात्याशी संपर्क साधला. मात्र, ‘यात विशेष काय?’ अशा अविभार्वात प्रकरण किरकोळीत काढण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कायद्यावर बोट ठेवून सर्पमित्रांनी आक्रमक भूमिका घेतली. तक्रार दाखल केली. अखेर नागांसह गारुड्याला वनअधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात स्थानबद्ध केले. अधिवास क्षेत्रात सोडणार.. वाईतील गंगापुरी येथून ताब्यात घेण्यात आलेल्या नागाचे टाके वनविभागाच्या वतीने काढून टाकण्यात आले. सध्या नाग वनविभागाच्या देखरेखीत असून, त्याला लवकरच त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडणार असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. कठोर शासन व्हावे ! सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाला दूध पाजण्याचा हा अघोरी प्रकार रविवारी नागपंचमीच्या दिवशी उघडकीस आल्याने पर्यायवरणप्रेमी तसेच नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांचा अशाप्रकारे छळ करणाऱ्यांवर कठोर शासन व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे अघोरी प्रकार करू नये. उलट त्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वाई शहरात आठ फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. आपण फक्त नागपंचमीला नागाची पूजा न करता वर्ष भर त्याचा आदर करावा व त्याला मारू नये. - डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सह्याद्री प्रोटेक्टर्स, वाई