शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

‘पीक पाहून कर्ज’ आदेशच नाही : नाबार्ड

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जयकुमार गोरंची माहिती : मुंबईतील बैठकीत ‘आधी कर्ज द्या, मग खातरजमा करा’ यावर सकारात्मक चर्चा

सातारा : ‘पीकपाणी पाहून सवलतीच्या दरातील कर्जवाटप करण्याचे कोणतेच आदेश आम्ही दिले नाहीत. असे नाबार्डच्याच अधिकाऱ्यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सांगितल्याने जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाचे पितळ उघडे पडले आहे,’ अशी माहिती जिल्हा बॅँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. दरम्यान, आधी कर्ज द्या मग पीक पाहणी करा, अशी मागणी त्यांनी सहकारमंत्र्यांकडे केली असून, विषय पत्रिका पाच दिवस अगोदर देणे व कार्यकारी समितीचे अधिकार या विषयावर आ. गोरे यांनी सहकारमंत्र्यांची मुंबई येथील बैठकीत चर्चा केली.आ. गोरे यांनी सातारा जिल्हा बॅँकेच्या कारभारावरून सहकारमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी विधिमंडळ सभागृहात वारंवार केली होती. त्यानुसार मंगळवारी बॅँकेचे पदाधिकारी, संचालक आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली.पीकपाणी पाहून कर्ज वाटपाचा कोणताच आदेश नाबार्डने दिला नसल्याचे सांगूण आ. जयकुमार गोरे म्हणाले, ‘पीक कर्जाच्या वापराबद्दल खातरजमा करावी असे आमचे परिपत्रक आहे. संचालक मंडळाने तसे लेखी मागितल्यावर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी लेखी द्यायची गरजच काय? पीक कर्जाचा वापर झाला की नाही याची खातरजमा करणे म्हणजे कर्ज देऊ नका असे नाही. सहकार मंत्री पाटील यांनी बॅँकेत जर असे चुकीचे होत असेल तर आम्हीही मार्गदर्शन मागवतो,’ असे सांगितले.बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी तसे सांगितल्याने संचालक मंडळ तोंडावर पडले आहे. नाबार्डच्या परिपत्रकाचा गैरअर्थ काढून संचालक मंडळ शेतकऱ्यांचे शोषण करत असल्यानेच मी या विरोधात आवाज उठविला. आता संचालक मंडळाने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा धंदा बंद करावा. त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे. सगळ्या कर्जप्रकरणात संचालक मंडळावर फौजदारी दाखल होते म्हणून त्यांनी जबाबदारीचा विषय सोडून द्यावा.बँकेच्या सभेची विषयपत्रिका पाच दिवस अगोदर द्यावी लागेल, असे आयुक्त पवार यांनी सांगितले. पोट नियमाचा आधार घेऊन काही बँका तसे करत नाहीत. मात्र बँकाच्या विषयी नेमलेल्या कमिटीने विषयपत्रिका पाच दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतला होता. असेही त्यांनी सांगितले. संचालक मंडळाने आम्ही विषयसूची देणार असे सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही फार पारदर्शी आहात मग विषयपत्रिका द्यायला काय हरकत आहे? तुम्हाला ती द्यावी लागेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)ंंकर्जमंजुरीचा विषय समोर यायला हवा कार्यकारी समितीच्या अधिकारांबाबत सांगताना गोरे म्हणाले, ‘बँकेत काही चुकीचे घडले तर एटीएसच्या नोटीसनुसार सर्व संचालकांना जबाबदार धरले जाते. मग कर्जमंजुरीचा विषयही सर्वच संचालकांसमोर आला पाहिजे. कर्जप्रकरण मंजूर करण्यासाठी नसणाऱ्या संचालकांना दोषीच धरता येणार नाही असे आयुक्त पवार यांनी सांगितले. हायकोर्टाच्या रुलिंगप्रमाणे सर्वच संचालकांना जबाबदार धरले जाते त्यामुळे या विषयावर माहिती घेण्यासाठी मंत्री पाटील यांनी एक सदस्यीय कमिटी नेमण्याचा निर्णय घेतला.