शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूत आत्महत्या केलेल्या मायलेकी रेठरे खुर्दच्या !

By admin | Updated: April 3, 2016 23:42 IST

कारण अस्पष्ट : नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल

कऱ्हाड : टेंभू येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली महिला व मुलगी या दोघी मायलेकी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा त्या दोघींची ओळख पटली असून, त्या कऱ्हाड तालुक्यातीलच रेठरे खुर्दच्या आहेत. शशिकला जयवंत कारंडे (वय ३८) व शीतल जयवंत कारंडे (१५, दोघी रा. रेठरे खुर्द) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरा संबंधित महिलेची बहीण पोलिस ठाण्यात आल्यानंतर उलगडा झाला. कऱ्हाड नजीकच्या टेंभू गावात मुळुकाचा बिघा नावाच्या शिवारामध्ये शनिवारी सकाळी एका महिलेसह मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी महिलेची पर्स व कापडाने भरलेली प्रवासी बॅग आढळून आली. पर्समध्ये मोबाईल चार्जर व सातारा ते कऱ्हाड प्रवासाचे तिकीट मिळून आले होते. त्यामुळे संबंधित महिला व मुलगी सातारा परिसरातील असण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच महिलेच्या पायावर सिमेंटचे पांढरे व्रण असल्याने दोघीही बांधकाम मजूर असाव्यात, असाही कयास निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने रविवारी दिवसभर पोलिस तपास करीत होते. मात्र, उशिरापर्यंत त्यांना कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला व तिचा मुलगा कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात आले. त्यांनी आत्महत्या झालेल्या दोघींची ओळख सांगितली. पोलीस ठाण्यात आलेली महिला ही मृत महिलेची बहीण होती. पोलिसांची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्यांची नावे दिली. अन्य नातेवाइकांना कळविले आहे. तिच्या माहेरकडील लोकांना बोलवले असून रात्री उशिरापर्यंत ते कऱ्हाडात पोहोचले नव्हते. शशिकला व शीतल या दोघींनी आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाइकांकडे चौकशी झाल्यानंतर सोमवारी हे कारण समोर येईल, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)