शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Satara : माझे मूल माझे जबाबदारी योजनेचा शुक्रवारी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:10 IST

CoronaVirus In Satara : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्ण संख्या कमी होईल. जिल्ह्यात अजून जे निर्बंध लागू आहेत ते देखील उठण्याच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु लोकांनी त्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आता दर शुक्रवारी परिस्थिती बघून आदेश काढले जातील असे स्पष्टीकरण जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

ठळक मुद्देमाझे मूल माझे जबाबदारी योजनेचा शुक्रवारी प्रारंभ तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

सातारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्ण संख्या कमी होईल. जिल्ह्यात अजून जे निर्बंध लागू आहेत ते देखील उठण्याच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु लोकांनी त्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आता दर शुक्रवारी परिस्थिती बघून आदेश काढले जातील असे स्पष्टीकरण जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.सातारा जिल्ह्यात करोना संक्रमणाची घटलेली टक्केवारी ही नैसर्गिक आहे. जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत शनिवार ते शुक्रवार अशी आकडेवारी संकलित करून जिल्ह्याच्या संक्रमणाची प्रतवारी निश्चित होणार आहे . तिसऱ्या लाटेचे संक्रमण उद्भवू नये यासाठी सातारकरांनी करोना प्रतिबंधक नियमाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होवू नये याकरिता सातारा कराड फलटण वाई या चार तालुक्यात लहान मुलांसाठी तीस ऑक्सीजन बेडची विशेष रुग्णालये उभारली जात आहेत . यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माझे मूल माझी जवाबदारी या योजनेचा शुभारंभ येत्या शुक्रवारपासून येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे शेखरसिंह यांनी स्पष्ट केले .सातारा जिल्ह्यात करोना संक्रमण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी शेखरसिंह पुढे म्हणाले, करोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणे ही सातारा जिल्हावासियांची जवाबदारी आहे . जिल्ह्यात संकमणाची टक्केवारी सध्या ९.७५ टक्के असून ती पूर्णतः नैसर्गिक आहे .

सर्व आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या आकडेवारीचे काटेकोर संकलन केले जात आहे . जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत दर आठवड्याला शनिवार ते शुकवार अशा आकडेवारीचे शास्त्रीय संकलन करून संक्रमणाची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे .सातारकरांनी करोनाची तिसरी लाट उद्भवू नये याकरिता सामाईक अंतर राखणे, विनाकारण गर्दी न करणे या उपाययोजनांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे .लसीकरणा संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ५८१ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून जिल्हयात एकूण ५६ टक्के लसीकरण झाले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे खाजगी दवाखान्यांमध्ये सुध्दा दीडशे रूपयांच्या नाममात्र शुल्कात लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात आयसीयू व ऑक्सीजन बेडची क्षमता पाच हजारापर्यंत वाढविणे, जिल्ह्याची ४८ मेट्रिक टन ऑक्सीजनची पूर्तता करणारे ऑक्सीजन प्लॅन्ट उभारणे, कॉन्स्ट्रेटरचा मुबलक पुरवठा ठेवणे, इ उपाययोजना युद्ध पातळीवर राबविले जात असून बालरोगतज्ञांच्या टास्कफोर्सच्या सूचनेप्रमाणे ० ते २ बालकांसाठी मास्क न वापरणे, २ ते ५ वयोगटाच्या बालकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करणे, व ५ वर्षापुढील बालकांना मास्कची सक्ती करणे ही नीती अवलंबिली जाणार असून त्या पध्दतीने पालकांना समुपदेशन करणाऱ्या चित्रफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत . बालकांची विशेष हॉस्पिटल्स ही अंगणवाडीच्या धर्तीवर विकसित करताना येथील वातावरण हलकेफुलके ठेवणेकरिता बालरोगतज्ञांचा विशेष सल्ला घेतला जाणार आहे .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर