शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत वाद्य वाजविण्याचा मान मुस्लीम बांधवांना-शंभर वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:27 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या शंकर-पार्वती गणपतीला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चथुर्दशीला शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच या मूर्तीचे विसर्जन केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या गणपतीच्या मिरवणुकीत वाद्य वाजविण्याचा मान गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम बांधवांनाच दिला जातो. ही ...

ठळक मुद्दे मानाच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे होते सर्वात शेवटी विसर्जन; डामडौल अन् गुलालाची उधळण न करता मिरवणूकअनंत चथुर्दशीला पारंपरिक पद्धतीने शंकर-पार्वती गणेशाची सवाद्य मिरवणूक काढली जाते. उत्सवासाठी येणारा सर्व खर्च परदेशी कुटुंबाच्या वतीने

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या शंकर-पार्वती गणपतीला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चथुर्दशीला शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच या मूर्तीचे विसर्जन केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या गणपतीच्या मिरवणुकीत वाद्य वाजविण्याचा मान गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम बांधवांनाच दिला जातो. ही परंपरा आजही सुरू आहे.

शनिवार पेठेत राहणाºया राहुल परदेशी यांच्या कुटुंबीयाच्या वतीने दरवर्षी शंकर-पार्वती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. मध्यभागी शंकर, उजव्या बाजूला श्री गणेश व डाव्या बाजूला पार्वती अशा रुपातील ही मूर्ती शाडू मातीपासून बनविली जाते. विशेष म्हणजे, राहुल परदेशी स्वत:च्या हाताने ही मूर्ती साकारतात. साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या या गणेशाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. तिसºया पिढीतील राहुल परदेशी हे गेल्या २६ वर्षांपासून मूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत.

अनंत चथुर्दशीला पारंपरिक पद्धतीने शंकर-पार्वती गणेशाची सवाद्य मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक अत्यंक साध्या पद्धतीने कोणताही डामडौल व गुलालाची उधळण न करता काढली जाते. मिरवणुकीत दोनच वाद्ये वाजविली जातात. ही वाद्ये वाजविण्याचा मान मुस्लीम बांधवांना दिला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया’ऐवजी ‘शिव सांब हर-हर’ असा जयघोष केला जातो. विसर्जन मार्गात ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने मूर्तीचे स्वागत व पूजा केली जाते. शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमंडळांच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर सर्वात शेवटी शंकर-पार्वती गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते.ना मंडळ.. ना ट्रस्टशंकर-पार्वती गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीचे कोणतेही मंडळ नाही अथवा ट्रस्ट नाही. गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीही गोळा केली जात नाही. उत्सवासाठी येणारा सर्व खर्च परदेशी कुटुंबाच्या वतीने केला जातो. मानाचा गणपती असल्याने दर्शनासाठी उत्सवकाळात शहर व परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.शाडू मातीची मूर्तीशनिवार पेठेतील राहुल परदेशी यांनी शाडू मातीपासून शंकर-पार्वती गणपतीची मूर्ती साकारली आहे. जेव्हा पासून या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस प्रारंभ झाला, तेव्हापासून ही मूर्ती शाडूपासूनच बनवली जात आहे.रंगकामासाठी प्रामुख्याने पोस्टर कलरचा वापर करण्यात येतो, अशी माहिती राहुल परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.