शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खाण कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

By admin | Updated: January 1, 2017 23:15 IST

गूढ कायम : वाठार स्टेशनजवळील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

वाठार स्टेशन : खाण कामगाराचा चार दिवसांपूर्वी खून करून मृतदेह अज्ञाताने विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी पिंपोडे खुर्द हद्दीत उघडकीस आली. संजय उमाजी राठोड (वय २५, रा. जेऊरवाडी, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय राठोड हा तापोळा (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी दगड फोडण्याचे काम करत होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ, सासू-सासरे व नातेवाईक राहात होते. तर त्याची पत्नी मुलांच्या शिक्षणासाठी गावीच जेऊरवाडी या ठिकाणी राहात आहे. तीन दिवस दगड फोडण्याचे काम बंद होते. त्यामुळे बायकोला पैसे पाठविण्यासाठी संजय गुरुवारी साताऱ्यात आला. मात्र, त्या दिवसांपासून त्याचा काहीच थांगपत्ता नव्हता. दरम्यान, संजय याचा मामा लक्ष्मण राठोड यांना रविवारी एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने आपले नाव न सांगता संजय याचा मृतदेह विहिरीत असल्याचे लक्ष्मण राठोड यांना सांगितले. याची माहिती संजय याच्या वडिलांना त्यांनी सांगितली. त्यानंतर वडील व मामा वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी गेले. इतर नागरिकांच्या मदतीने संजयचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्याच्या अंगावर सर्वत्र जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्याचा खूनच झाला असल्याची तक्रार वडील उमाजी राठोड यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)