शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकांसह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: June 21, 2016 01:20 IST

संशयित मृत्यू प्रकरण : मेहुण्याची फिर्याद; पंचवीस लाख मागितल्याचा आरोप; न्यायासाठी अखिल भारतीय वडार समाजाचा कऱ्हाडला मोर्चा

\कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताच्या मृत्यूप्रकरणी अखेर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयितांकडे पंचवीस लाख रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत मृत रावसाहेब जाधवचा मेहुणा हिराजी ऊर्फ अनिल दशरथ डिकोळे (रा. घोटी, ता. करमाळा) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १७ जून रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिराजी ऊर्फ अनिल हा घरी असताना त्याचे दाजी रावसाहेब जाधव हे त्याच्याकडे आले. ‘मला पोलिस पकडायला आले आहेत, आपण दोघे दुचाकीवरून कोठे तरी जाऊ,’ असे म्हणून त्यांनी अनिलला सोबत घेतले. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून (एमएच ४५ वाय ३४००) केम रोडच्या दिशेने गेले. त्यावेळी पाठीमागून आलेली कार अचानक दुचाकीसमोर येऊन थांबली. त्यातून चौघेजण खाली उतरले. त्यांनी रावसाहेब व अनिल या दोघांना कारमध्ये घेतले. त्यानंतर कार केम, रोपळे, कुर्डुवाडी, शेटफळ चौक मार्गे पंढरपूरमध्ये नेण्यात आली. त्याठिकाणी आणखी एक कार आली. रावसाहेब व अनिल यांना त्या कारमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर कार कऱ्हाडच्या दिशेने निघाली. रस्त्यात कारमध्येच पोलिसांनी या दोघांना मारहाण केली. तसेच ‘पंचवीस लाख रूपये द्या, लगेच सोडतो,’ असेही सांगितले. पैसे देण्यास रावसाहेब यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या दोघांना कऱ्हाड येथील कार्वेनाका पोलिस चौकीत आणण्यात आले. कार्वेनाका पोलिस चौकीत आल्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक विकास धस व सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी त्याठिकाणी आले. त्यांनी या दोघांना हातपाय बांधून काठी व पट्ट्याने मारहाण केली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मारहाण सुरूच होती. त्यानंतर धस व काकंडकी तेथून निघून गेले. दोन पोलिस कर्मचारी मात्र त्याचठिकाणी थांबून होते. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रावसाहेब जाधव यांना त्रास होऊ लागला; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा विकास धस व हणमंत काकंडकी यांनी त्याठिकाणी येऊन रावसाहेब जाधव यांना मारहाण केली. त्यावेळी ते बेशुद्ध पडले. विकास धस यांनी जाधव हा जिवंत आहेत का याची खात्रीही केली. त्यानंतर अनिलला शासकीय जीपमधून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत नेले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सिटी मेडिकल सेंटरमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले. तसेच रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयात नेऊन रावसाहेब जाधव यांचा मृतदेह दाखविण्यात आला.