शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

By admin | Updated: June 28, 2017 23:16 IST

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीमुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये अंसतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे रंगेहाथ पकडलेल्या नगराध्यक्षांनी नितीमत्ता बाळगून राजीनामा द्यावा, अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राजीनाम्यासाठी शुक्रवार, दि. ३० रोजी नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर मुंडण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.अनिल सावंत म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ही न्यायप्रविष्ट बाब असली तरीही सुसंस्कृत वाई शहरात चुकीच्या गोष्टींना पाठिंबा मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांचा पोलिस बंदोबस्तात कारभार चालविण्याचा प्रकार म्हणजे पदाचा अपमान आहे. मोर्चा काढून, वाई शहर बंद ठेवून, आपला राग व्यक्त करून सुध्दा, नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची इच्छा नाही. त्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारी वाईकर नागरिक पालिकेसमोर मुंडण करून निषेध व्यक्त करणार आहेत.द्रविड हायस्कूलच्या मुख्याद्यापकांना गुरुवारी शिंदे यांच्या निलंबनासाठी माजी विद्यार्थी लेखी निवेदन देणार असल्याचा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला. यावेळी अ‍ॅड.श्रीकांत चव्हाण, भारत खामकर, चरण गायकवाड, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, दीपक हजारे, संदीप डोंगरे, अजित शिंदे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यानी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व त्यांच्या पतींवर टिकेची झोड उठवत भाजप व काँग्रेसवरही निशाणा साधला. चौदा हजारांची लाच घेताना सापडलेल्या नगराध्यक्षांनी वास्तविक लगेच दुसऱ्या दिवशी केलेल्या कृत्याविषयी वाईकरांची माफी मागून राजीनामा देणे आवश्यक असतानाही त्या " तो मी नव्हेच " अशा पध्दतीने वावरत पोलिस बंदोबस्तात पालिकेत हजार होऊन मी निर्दोष असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप होत आहे. स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित समजाणाऱ्या नगराध्यक्ष व त्यांच्या पतीने सांस्कृतिक वाईनगरीचे नाक कापले असल्याची संतप्त भावना नागरिकांची असल्याचा दावा तीर्थक्षेत्र आघाडीने केला आहे. राजकारण असो की समाजकारण, वाईने नेहमीच महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. ऐतिहासिक, अध्यात्मिक व विद्वत्ता हे वाईचं वैभव आहे.