शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गड पालिकेचा... अन् साकडं वाड्यावर !

By admin | Updated: October 21, 2016 01:15 IST

उमेदवारी मिळविण्यासाठी पळापळ : तिकीट निश्चितीसाठी आजी, माजी अन् भावी नगरसेवक नेत्यांच्या घरी दाखल

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही राजेंच्या वाड्यावर अनेकांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. तर तिकीट मिळालेच नाही तर अपक्षही लढण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. जुन्या व मातब्बरांना या वेळेस डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. मनोमिलन होईल किंवा नाही, याचे आम्हाला देणे घेणे नाही. मात्र, तिकीट मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू आहे. तर दोन्ही राजेंच्या निकटचे कोण आहे, याची नवखे उमेदवार चाचपणी करत आहेत. अशा लोकांना मध्यस्थी करण्यास सांगून आपल्या पदरात तिकीट पाडून घ्यायचे, असे काहींनी मनसुबे आखले आहेत. दसऱ्याच्या शुभेच्छाच्या निमित्ताने वाड्यावर गेलेल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सूचक आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्येकजण आम्हालाही नेत्यांनी असेच सांगितले आहे, त्यामुळे तिकीट नेमके कोणाला मिळणार, या संभ्रमात दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते आहेत. तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्यासाठी काय करावे लागेल, याचेही इच्छुक उमेदवारांकडून आडाखे बांधले जात आहेत. (प्रतिनिधी) कोण काढतंय जातीचा तर कोण उत्पन्नाचा दाखला ! सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करत आहेत. जातीचा दाखला, उत्पन्नाचे विवरण, प्रतिज्ञा पत्र भरून घेण्यासाठी तहसील कार्यालयात भावी नगरसेवकांची गर्दी होत आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. कागदपत्र नसल्यास उमेदवारी बाद होते किंवा चुकून विजयी झालो तरी एखादे कागदपत्र नाही म्हणून घरी बसावे लागते. त्यामुळे सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यामध्ये जातीचा दाखला, वंशावळ, उमेदवारी अर्ज आदी कागदपत्रे भरून घेण्यासाठी येथील मुद्रांक विक्रेत्यांकडे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी तयारी करत आहेत. जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने अर्ज दाखल करण्याच्या अगोदर इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र तयार करून घेत असल्याने अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नसल्याने ही पूर्व तयारी केली जात आहे. सातारा पालिकेत अनेक उमेदवार इच्छुक असल्याने नेत्यांकडून अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर केली नसली तरी उमेदवारी मिळण्याच्या आशेने इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. तर काहींनी पक्षाचे तिकीट नाही मिळाले तरी अपक्ष उभे राहण्याची मानसिकता केली असल्याने नामनिर्देशन भरण्यासाठी सातारा तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)