शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मुमताज चौधरी हाजीर हो..!

By admin | Updated: June 19, 2014 00:46 IST

सातारा जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम नोटीस : दहा दिवसांत म्हणणे मांडा अन्यथा एकतर्फी निर्णय

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका मुमताज लतिफ चौधरी यांना वारंवार म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे सादर केलेले नाही. परिणामी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी बुधवारी अंतिम नोटीस काढून दहा दिवसांच्या आत आपले म्हणणे सादर करण्यास बजावले आहे. दरम्यान, यानंतरही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाहीतर आपल्याबाबतीत एकतर्फी निर्णय देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात बजावले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात पाचगणी, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड नगरपालिकेच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या सुणावनी सुनावणी सुरू आहे. या सुनावणीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.मुमताज लतीफ चौधरी या सातारा पालिकेच्या नगरसेविका असून त्यांनी त्यांचे वजन वापरून जावयाच्या नावावर घंटागाडीचा ठेका घेतला असल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशा आशयाची याचिका माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दि. २३ जुलै २0१३ जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे दाखल केली आहे. विशेष म्हणजे हे ठराव संमत करत असताना स्वत: मुमताज चौधरी पालिकेच्या बैठकीला हजर होत्या. ही बाब गंभीर असल्याचेही मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट केले आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनाही मोरे यांनी याप्रकरणी प्रतिवादी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची दोनवेळा सुनावणी झाली. दोन्हीवेळी मुमताज चौधरी यांचे वकील हजर राहिले असलेतरी त्यांनी म्हणणे मांडलेले नाही. विशेष म्हणजे म्हणणे दाखल करण्यासाठी चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. ६ डिसेंबर २0१३ रोजी मुदतही मागितली होती. तरीही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुमताज चौधरी यांना दहा दिवसांच्या आत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. या मुदतीतही म्हणणे सादर नाही केले तर तक्रारदाराचा अर्ज, उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी निर्णय देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या अंतिम पत्रामुळे सातारा पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून त्याकडे अनेकांच्या नजरा आहेत. (प्रतिनिधी)