शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देऊरच्या मुधाई देवीचा मुंबईच्या मैदानात थाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:50 IST

वाठार स्टेशन : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या देऊर येथील स्वयंभू मुधाई देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती चारकोप मुंबई येथील मराठा ...

वाठार स्टेशन : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या देऊर येथील स्वयंभू मुधाई देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती चारकोप मुंबई येथील मराठा मित्र मंडळाने साकारली आहे. येथील दादोजी कोंडदेव मैदानावर या मंडळाने साकारलेला हा देखावा सध्या सर्वांचे आकर्षण ठरला आहे.देऊर येथील ग्रामदैवत असलेल्या स्वयंभू मुधाई देवीच्या शारदीय नवरात्र उस्तवास सुरुवात झाली असून, नऊ दिवसांच्या या उत्सवात हजारोंच्या संख्येने राज्यभरातून भाविक भक्त देवीचे दर्शन घेतात, या देवीची अष्टमीला मोठी यात्रा भरते. मुधाईदेवी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असल्याने या देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यादरम्यान रोज वेगवेगळ्या रुपात देवीची वेशभूषा केली जाते तसेच सकाळी व सायंकाळी मुधाई देवीची गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढली जाते.अष्टमीच्या दिवशी पहाटेपासून यात्रेला प्रारंभ होतो. या दिवशी कडाकनी-धपाटेचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. दुपारी बारा वाजता शेजारील दहिगावमधील चव्हाण ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पालखी सोहळ्यास सुरुवात होते. दहिगाव येथील मुधोजी चव्हाण या भक्तामुळे या देवीचे नामकरण मुधाई देवी असल्याची कथा असल्याने या गावच्या ग्रामस्थांना पालखीचा मान दिला असल्याचे सांगितले जाते.डोंगरकड्यात स्वयंभू स्थानापन्न असलेली मुधाईदेवी ही नवसाला पावणारी असल्याने या देवीला वर्षभर भाविक भक्ताची मांदियाळी असते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि अवघ्या दीड फुटाचा मुख्य प्रवेशद्वार असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या देवीचं महात्म्य एकूण चारकोप येथील मुधाई भक्तांनी देऊरच्या या देवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारून देवीचे महत्त्व जोपासले आहे. येथील मराठा मित्र मंडळाकडून सलग २३ वर्षे दुर्गाष्टमी साजरी केली जाते. चालू वर्षी या मंडळाने मुधाईचा देखावा साकारला आहे.