शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुंबईकर करतायत गावचं राजकारण!

By admin | Updated: July 28, 2015 23:25 IST

गावोगावी निवडणुकांची रणधुमाळी : सुटी घेऊन गावातच मुक्काम; हालचालींवर बारीक लक्ष

सातारा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावांत निवडणूक हाच विषय चर्चेला जात आहे. मात्र, या सर्वांवर नजर आहे ती मुंबईकरांची. कामानिमित्त स्थायिक झालेले मुंबईकर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुटी घेऊन गावी आले आहेत. हंगामी राजकारण करून मुंबईकर आख्खं गाव ढवळून काढत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.जिल्ह्यात ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटून गेल्यामुळे आता एकमेकांविरोधातल्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शक्यतो छुपा प्रचार सुरू असतो. ग्रामीण भागामध्ये एकमेकांचे नातेवाईक, मित्र आणि भावकी यामध्ये मतांची गणिते ठरलेली असतात. स्थानिक पातळीवर एकमेकांचे मतभेद असल्यामुळे निवडणुकीमध्ये अशी लोकं एकमेकांना पाण्यात पाहतात. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा ‘हार’मनाला चटका लावून जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते, ती मुंबईकरांची. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईकरांची गावच्या राजकारणाकडे विशेष नजर आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच मुंबईकर सुटी घेऊन गावी खास प्रचारासाठी आले आहेत. जुन्या जाणत्या लोकांना भेटून आपलं गाव कसे मागे आहे, कोणामुळे आहे, आपण सुधारलं पाहिजे, अशी शाब्दिक फेकाफेकी करून आपल्या पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईकरांच्या शब्दाला मान देऊन ‘हो.. रे तू सांगतोय त्यालाच आपण मतदान करणार,’असेही त्याला तात्पुरते आश्वासन दिले जात आहे. आळीतलं आणि भावकीतील मतदान किती आहे, याचे आडाखे मुंबईकर बांधत असले तरी गावची लोकं ताकास तूर कळून देत नाहीत. जेवणावळी घालून गावकऱ्यांना खूश केले तरी मतदान त्यालाच होईल, हेही सांगता येत नाही. तरीही मुंबईकरांचा आटापिटा सुरूच आहे. हंगामी राजकारण करून गावचा विकास करायला आलेल्या मुंबईकरांना किती मनावर घ्यायचं, हे गावकरीच ठरवतोय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांची ‘हंगामी राजकारण’मध्ये होत असलेली एन्ट्री भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)