शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई पोर्ट ट्रस्ट अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 01:34 IST

विजयी संघास १,०१,१११ रुपये व भव्य चषक तर उपविजेत्या संघास रोख ५०,००० रुपये व चषक देण्यात आला.

पाचगणी : पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिंद्रा मुंबई यांच्यात अटीतटीचा चुरशीचा सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात मुंबई पोर्टच्या मुबीद शेख याने आणि महिंद्राच्या आनंदा पाटील यांनी आक्रमक चढाया करून प्रेक्षकांची मने जिंकली.शेवटच्या चढाईत मुंबई पोर्टच्या प्रमोद घुलेने गडी बाद करत आपल्या संघाला केवळ एका गुणाने विजय मिळवून दिला व विजेतेपद पटकावले. महिंद्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते. तर बी.ई.जी ला तृतीय क्रमांक मिळाला.विजयी संघास १,०१,१११ रुपये व भव्य चषक तर उपविजेत्या संघास रोख ५०,००० रुपये व चषक देण्यात आला. तर तृतीय क्रमांकास २५,००० व चषक देण्यात आला. या स्पर्धेचा बक्षीसवितरण समारंभ आमदार मकरंद पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, महाबळेशवर माजी नगराध्यक्ष पी. डी. पार्टे, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक व पंचायत समिती सदस्य राजेंद्रशेठ राजपुरे, महाबळेश्वर उपसभापती संजय गायकवाड, आरिफभाई शेख, दत्ता वाडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘व्यायाम मंडळाने कबड्डी स्पर्धेचे व्यापकपणे केलेले आयोजन उत्कृष्ट असून, या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना आपल्या क्रीडागुणांना वाव मिळत आहे. तर राज्य पातळीवरील संघाचा खेळ पाहून त्यातून आणखी शिकण्यास मदत होत आहे. या मंडळाने अमृतमहोत्सव साजरा करून पाचगणीतील कबड्डीच्या वलयाला आणखी झळाळी दिली आहे. पाचगणीची ही परंपरा पुढेही कायम राहावी. कबड्डी स्पर्धांना आपले सहकार्य असतेच; परंतु इतरही स्पर्धा मंडळाने भरवल्यास आपले सर्वतोपरी सहकार्य राहील.’राज्यस्तरीय महिलांचा अंतिम सामनाही रोमहर्षक झाला. यामध्ये शिवशक्ती मुंबई आणि महात्मा गांधी मुंबई यांच्यातील झालेला सामना शिवशक्तीने एक गुणाने जिंकला. तर महात्मा गांधी मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजमाता पुणे संघाला तृतीय तर वाघेश्वर पुणेला चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस मिळाले. स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)