शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने मुळीकवाडी धरण पडणार कोरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : फलटण पश्चिम भागात मान्सून व मान्सून पूर्व पावसाने दडी मारल्याने रब्बी हंगाम वाया जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : फलटण पश्चिम भागात मान्सून व मान्सून पूर्व पावसाने दडी मारल्याने रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, चार गावांच्या पाणीपुरवठा योजना व शेकडो एकर बागायती क्षेत्र मुळीकवाडी धरणावर अवलंबून असते; पण धरणच पंधरा दिवसांत कोरडे पडणार असल्याने पाणीप्रश्न बिकट बनणार आहे. त्यामुळे धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फलटण पश्चिम भागातील दुष्काळी भागात मुळीकवाडी गावच्या हद्दीत १९७१ मध्ये दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करून पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये पाणीसाठा होऊन पोटपाटाने नांदल व मुळीकवाडी गावचे क्षेत्र ओलिताखाली आले, तर घाडगेवाडी, सासवड येथील शेतकऱ्यांनी धरणातील पाणी पाईपलाईनद्वारे उचलून शेती बागायती करण्याचा प्रयत्न केला आहे.

दुष्काळी भागाच्या पिण्याच्या पाण्यासाठी सहा ते सात कोटी खर्च करून सासवड प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे व चाचणी घेत असतानाच असफल ठरली. त्यामुळे समाविष्ठ गावातील मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड, नांदल या गावांनी मुळीकवाडी धरणात व धरणाखाली सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहीर खोदून गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवून पाणी टंचाईवर मात केली आहे.

गत पाच-सहा वर्षे धोम-बलकवडीचे पाणी धरणात सोडत असल्याने गावे टँकरमुक्त व टंचाईमुक्त झाली. याबरोबर बागायती क्षेत्र वाढून ऊस, फळबाग, कांदा, टॉमेटो आदी नगदी पिकाच्या लागवडीत वाढ झाली. यावर्षी जून महिन्यापासून रिमझिम पडत आहे. धरण क्षेत्रात व डोंगरावर मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. बाष्पिभवन व पाणी उपशामुळे पाण्याने तळ गाठला आहे.

धोम-बलकवडी कालव्यात एक महिना झाले पाण्याचे आवर्तन सोडले आहे. संबंधित गावांनी पाणी सोडण्यासाठी गावचे ठराव पाठवले आहेत तरी पाणी सोडले नाही. येत्या पंधरा दिवसांत पाऊस व धोम-बलकवडी कालव्याचे पाणी न सोडल्यास पाणी प्रश्न बिकट होणार आहे, तरी धरणात पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

कोट..

पाणी मागणी ठराव दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाकडे पाठवला आहे. पाणीपट्टी शेतकऱ्याकडून गोळा करून भरणार आहे मुळीकवाडी धरणात पाणीसाठा अल्प प्रमाणात आहे.

-गणेश कदम, उपसरपंच, मुळीकवाडी, ता . फलटण

२२आदर्की

मुळीकवाडी ता. फलटण येथील धरणात अल्पसाठा उपलब्ध आहे.