शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

‘महावितरण’ने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST

म्हसवड : ‘कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली ...

म्हसवड : ‘कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर सक्तीची वीज बिल वसुली थांबली नाही तर ‘महावितरण’ला ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची भूमिका आम्हाला तातडीने घ्यावी लागेल. महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये,’ असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दिला. दहिवडी येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पिके आहेत. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेतीपंपासाठी वीजजोडणी मागत आहेत. ती जोडणी देण्यास शासन कायम टाळाटाळ करत आहे. वीजजोडणी न दिल्यामुळे शेतकरी अवैधरीत्या विजेचा वापर करीत आहेत. विजेचा वापर सुरूच आहे, त्यामुळे प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर हे ओव्हरलोडेड आहेत. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी जेव्हा शेतकरी महावितरणकडे जातात, त्यावेळी वीज बिल भरल्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर जोडणार नाही, अशी भूमिका महावितरण घेते. महिनोन‌्महिने डीपी जोडले जात नाहीत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आणलेले पीक फक्त वीज उपलब्ध न झाल्यामुळे वाया जात आहे. आधीच परिस्थितीने भरडलेल्या शेतकऱ्यांचे महावितरणकडून शोषण सुरू आहे.

राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, आम्ही सक्तीची वीज बिल वसुली करणार नाही; पण वस्तुस्थिती वेगळी आहे. कोरोना कालखंडानंतर शेतकऱ्यांना शेती पंपाची बिले आली. जी बिले शेकड्यांत येत होती, ती बिले हजारांमध्ये आली. एका शेतकऱ्याला तर दीड लाख रुपये बिल आले आहे.

(चौकट)

शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर आम्ही बिल कमी करून देऊ, असे ते म्हणतात; पण मुळात जी बिले पन्नास, शंभर, दोनशे, तीनशे पटींनी आलीत, ती फक्त दहा, वीस टक्के कमी करून काही साध्य होत नाही. महावितरणकडून जी चुकीची बिले आलीत, त्यांची पूर्वीची सरासरी काढून बिले द्यावीत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.