शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:40 IST

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे ...

सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला संदर्भाने लागलेला निकाल हा या समाजाला अंधकारात लोटणारा आहे. मराठा समाजाच्या दारिद्र्य याबाबतचे सगळे पुरावे दिलेले असतानाही आरक्षण का मिळत नाही, याचा जाब आता लोकांनी आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून विचारला पाहिजे,’ असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या आरक्षणाला धोका न पोहोचवता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी आहे. गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र, केवळ या समाजात आमदार, खासदार, मंत्री शिक्षण सम्राट आहेत, म्हणून मराठा आरक्षण नाकारले गेले. केवळ पाच टक्के लोकांकडे सत्ता आहे, साम्राज्य आहे. मात्र, ९५ टक्के जनता भांगलायला व मजुरीला जाते. कुळ कायदा लागला, तेव्हा मराठ्यांच्या जमिनी गेल्या. शासनाने सिलिंग लावलेत, तेव्हा जमिनी गेल्या. आता या समाजातील लोकांपुढे मजुरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. या समाजाला शिक्षणात ते आरक्षण मिळायला हवे होते. मात्र, शासन तेही देऊ शकलेले नाही.’

भारताचा नागरिक म्हणून मी सांगतो, अन्याय का खपवून घ्यायचा, असे स्पष्ट करत उदयनराजे पुढे म्हणाले की, ‘आता इतका अंधकार पसरला आहे की, मराठा समाजातील मुलांना सरकारने विष प्यायची परवानगी द्यावी, नाही तर काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील जाती धर्मात तेढ निर्माण होईल. राज्य शासन केवळ केंद्र शासनाकडे हा विषय ठरवत आहे. वास्तविक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील आहे. आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करूनही या मागणीला राज्यशासनाने बगल दिली. आरक्षणाची केस न्यायालयात उभी असताना, त्या तारखेला राज्य शासनाचा वकील हजर राहत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पाहिलेले आहे.

आता कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, त्याच्या घरासमोर जावा. त्या आमदार-खासदारांना रस्त्यात अडवून त्यांना बोलतं करा. मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, असं त्यांना विचारा. त्यांच्याकडून काही समाधान झाले नाही, तर त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही, असे कळवा. लोकप्रतिनिधींनी कुठल्याही मस्तीत राहू नये. लोक त्यांची मस्ती उतरतील जनावरे परवडले, नेतेमंडळी माणुसकी नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये उदयनराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे म्हणाले...

- मराठा आरक्षण रद्दचा निकाल समाजाला अंधकारात लोटणारा

- आता लोकांवर विष पिण्याची वेळ

- तरुण नक्षलवादी बनतील

- राजकारण गेलं चुलीत श्वेतपत्रिका काढा

- जनावरे परवडले मात्र नेत्यांमध्ये माणुसकी नाही कोण