शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कास भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार

By admin | Updated: June 22, 2017 01:03 IST

शिवेंद्रसिंहराजे : पाचगणीत कारवाई का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सातारा-कास रस्त्यावरील स्थानिक भूमिपुत्रांनी स्वत:च्या वाडवडिलोपार्जित जागेवर छोटे-मोठे हॉटेल, व्यवसाय करून उपजीविकेचा मार्ग शोधला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,’ अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा ते कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाची शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेनंतर स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरण्याचे काम महसूल खात्यातील काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, हेच कर्मचारी बड्या धेंडांच्या समर्थकांच्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. अशांच्या पाठीशी आम्ही कदापिही नाही. ज्या भूमिपुत्रांनी स्थानिक पातळीवर वित्तसंस्थेचे कर्ज घेऊन उद्योगाची उभारणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील स्थानिकांनी अनेक सुविधा देण्यासाठी स्वत:च्या जमिनी विकल्या आहेत. दागिने गहाण ठेवले आहेत. तसेच बँकांचे कर्ज काढले आहे. अशांवर कारवाई झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणाने सातारकर उभे राहतील. या परिसरात बेकायदेशीररीत्या वीजजोडणी, पाणी नळजोडणी ज्यांनी केली आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून दाखवावी. आम्ही जी भूमिका घेतली ती फक्त स्थानिक भूमिपुत्रांसाठीच आहे. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे पुणे, मुंबई शहरात स्थलांतरीत व्हावे लागले आहे. आता उद्योग व्यवसायाची उभारणी करताना कायदा व नियमाची आठवण करून दिली जाते. पण पाचगणी, लोणावळा, उल्हासनगर या परिसरात अशाच पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट वनखात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर ज्यांचे अतिक्रमण असेल अशाच स्थानिकांबाबत दंडात्मक कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही. मात्र, याचा गैरअर्थ घेऊन जिल्हा प्रशासन जर धनदांडग्यांना पाठीशी घालत असेल तर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा सभापती मिलिंद कदम, स्थानिक भूमिपुत्र विजय माने, सोमनाथ जाधव, शंकरराव जांभळे, नीलेश जाधव, लक्ष्मण गोगावले, केशव जगताप, संतोष माने, संतोष आटाळे, राम पवार, संपत जाधव, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते. भाजपही भूमिपुत्रांसोबत कास परिसरातील बांधकामांवर निर्बंध घालून कारवाई सुरू केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष या लोकांसोबत ठामपणे उभा राहिला आहे. या प्रश्नावर मतभेद अथवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां-सोबत झालेल्या चर्चेवेळी दिली.