शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक प्रश्नांवर चळवळी

By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST

जवखेडाप्रकरणी दलित चळवळी आक्रमक

प्रदीप यादव - सातारा यंदाचे वर्ष हे सामाजिक चळवळींनी ढवळून निघाले. आरक्षण, भ्रष्टाचार, पुनर्वसन, अंधश्रद्धा निर्मूलन, जवखेडा हत्याकांड, शाडूच्या गणेशमूर्ती असे विविध सामाजिक विषय तीव्रतेने मांडण्यात सामाजिक चळवळी यशस्वी ठरल्या.मूर्तीविसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, यासाठी साताऱ्यात लोकचळवळ उभी राहिली. फलस्वरूप जवळपास ३ हजार घरांमध्ये शाडूच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना झाली. यंदा गाजलेले प्रकरण म्हणजे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी बेकायदा खरेदी केलेली शेतकऱ्यांची जमीन. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रकरणाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.शहरात रस्त्याकडेला, ओढ्यात झोपड्यांमध्ये थंडीने कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांना मायेची ऊब मिळावी, यासाठी ‘लोकमत’ने चळवळ उभारली. त्याला सातारकरांनी प्रचंड प्रतिसाद देत ३ हजार ५०० मुलांना ऊबदार कपडे वाटप केली. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. डॉ. भारत पाटणकर यांनी तापलेल्या राजकीय फायदा करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला; पण यश आले नाही. शेवटी मतदानात ‘नकाराधिकारा’चे शस्त्र उपसले आणि तेरा जिल्ह्यात ते वापरले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १० हजार १६६ मतदारांनी ‘नोटा’ वापरला. एकीकडे उमेदवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मशगुल असतानाच दुसरीकडे सामाजिक चळवळींनी विविध विषयांवर वातावरण गरम करत आपले अस्तित्व दाखवून दिले.यंदा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत धनगर, कातकरी, नंदीबैलवाले, महादेव कोळी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्दा पेटला. अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाने रान उठविले अन् उमेदवारांना प्रचारासाठी एक प्रभावी अस्त्र मिळाले. जवखेडाप्रकरणी दलित चळवळी आक्रमकअहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे घडलेल्या हत्याकांडाचे पडसात राज्यभर उमटले. आरोपींना पकडण्यात शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात राज्यभरात सामाजिक चळवळी रस्त्यावर उतरल्या. साताऱ्यातही विविध मागासवर्गीय चळवळींनी आंदोलन, मोर्चा काढून या प्रकारणाचे गांभीर्य तीव्रतेने मांडण्याचा प्रयत्न केला. दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबावेत, यासाठी ‘रिपाइं’ संघटनेच्या जिल्ह्यातील विविध शाखांनी आंदोलने केली.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अद्याप हाती लागले नाहीत. याबाबत शासन आणि प्रशासनाची असलेली उदासीनता याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी निषेध नोंदविला. पथनाट्य, कार्यशाळांमधून अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम प्रभावीपणे सुरू आहे.