शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिनादिवशीच आईचा मुलाच्या डोळ्यांदेखत मृत्यू

By admin | Updated: May 14, 2017 22:51 IST

लग्नाला जाताना घडली घटना; ट्रकचालकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : देशभर मातृदिन साजरा होत असतानाच मातृदिनादिवशीच आईचा मुलाच्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊर (ता. कोरेगाव) जवळ रविवारी सकाळी सात वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शैलेश प्रदीप सपकाळ (वय २८, रा. लोणंद, ता. फलटण) हा आई प्रविणा (५१) यांच्यासोबत चिपळूण, जि. रत्नागिरी येथे मावशीच्या मुलाचे लग्न असल्याने दुचाकीवरून निघाला होता. लोणंदहून वाठार मार्गे साताऱ्याकडे येत असताना देऊर गावच्या हद्दीत आल्यानंतर तुरळक पाऊस सुरू झाला. त्यामुळे शैलेशने दुचाकी थांबविली. रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून तो झाडाखाली उभा राहिला तर आई गाडीजवळ उभी होती. याचवेळी वाठार बाजूकडून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच १२ एलटी ९६९७) गाडीसह आईला जोरदार धडक दिली. यामध्ये आई प्रविणा या गंभीर जखमी झाल्या. शैलेशने इतर नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनाने आईला लोणंद येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच आईचा मृत्यू झाला.वाठार पोलिस ठाण्यात ट्रक चालक गणेश सर्जेराव खेडकर (रा. घोघास पारगाव, ता. शिरूर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.