शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश अधिकारी सुटीला गावाकडे!

By admin | Updated: September 10, 2015 00:43 IST

घरं तर पुण्यात : पण उदयनराजे म्हणाले होते, ‘घरातून बाहेर काढा !’

सातारा : ‘दुष्काळ निवारणासाठी लवकर निर्णय घ्या. त्यासाठी अधिकाऱ्यांना घरातून बाहेर काढा,’ असे आक्रमक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्यानंतर जिल्ह््यात जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु, जवळपास बहुतांश अधिकाऱ्यांची घरे जिल्ह््याबाहेरच असल्याचा शोध लागलाय. हे अधिकारी साताऱ्यात राहतच नसून दर शनिवार, रविवारी पुण्याला घराकडे जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता बोला..कोणत्या अधिकाऱ्यांना घरातून कसं बाहेर काढणार ? दुष्काळाची चटके आॅगस्टमध्येच बसायला लागले असल्याने लोकप्रतिनिधी सावध झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे सुरू केले आहेत. तर वास्तविक पाहता नैसर्गिक आपत्तीत सर्व प्रशासनाने, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे अपेक्षित असते. रात्रीचा दिवस करणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी लाभावेत, अशी जनतेची अपेक्षा असते. अधिकाऱ्यांना जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहता यावे म्हणून शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. ज्या ठिकाणी निवासस्थान उपलब्ध नाही, अशावेळी घरभाडे भत्ता दिला जातो; मात्र जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत व तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी राहतच नसल्याचे समोर आले आहे. काही निवासस्थानात ते एकटेच राहत असतात. सातारा, कऱ्हाडमध्ये शिक्षणाच्या सुविधा असतानाही अनेक अधिकारी, उच्च पदस्थ कर्मचाऱ्यांची मुलं पुणे-मुंबईला उच्च शिक्षणासाठी आहेत. त्यातून त्यांच्या बदल्या दर तीन किंवा पाच वर्षांनी होत असतात. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय पुणे, नाशिक या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शहरातच ठेवले आहे. दर शनिवार, रविवारी हे अधिकारी कुटुंबीयांकडे जात असतात. (प्रतिनिधी)