शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी संततधार.. संध्याकाळी मुसळधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. सकाळी संततधार, दुपारी मुसळधार अन् संध्याकाळी धुवांधार अशी पावसाची तीन रूपे सातारकरांनी मंगळवारी अनुभवली.शहर व परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. जोरदार सरी कोसळू लागल्यानंतर शहरात दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. सकाळी संततधार, दुपारी मुसळधार अन् संध्याकाळी धुवांधार अशी पावसाची तीन रूपे सातारकरांनी मंगळवारी अनुभवली.शहर व परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. जोरदार सरी कोसळू लागल्यानंतर शहरात दोन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होईल का? अशी चिंता नागरिकांना लागली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांची चिंता मिटली.पावसाने अधूनमधून विश्रांती घेतल्याने कोठेही पाणी साचले नाही. सदर बझार परिसरात नाले व गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाºया पादचाºयांना पाण्यातून वाट काढावी लागली. नवारात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मंडप उभारणीचे काम सुरू आहे. मंगळवारी भर पावसातही कार्यकर्त्यांचे मंडप उभारणीचे काम सुरूच होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे धांदल उडाली.गोडोलीकरांनी घेतला मोकळा श्वास...सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका गोडोली व परिसराला बसला. सखल भागात पाणी साचूून राहिल्याने येथील नागरिक व व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. साचलेले पाणी नागरिकांना हाताने बाहेर काढावे लागले होते. या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने गोडोली तळ्याशेजारील ओढ्यावरील चेंबर फोडून ओढ्याचे पाणी तळ्यात सोडल्यात आले. त्यामुळे ओढा तुंबण्याचा प्रकार थांबला. मंगळवारी झालेल्या पावसाचा काहीच परिणाम गोडोलीकरांना जाणवला नाही. परिसरात कुठेही पाणी साचले नसल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.