शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी चालणाऱ्यांना ना तमा पावसाची

By admin | Updated: August 13, 2014 23:33 IST

आरोग्य : पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय

सचिन काकडे-सातारा  --मनुष्य जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. म्हणून तर ‘चांगले आरोग्य हाच खरा दागिना’ असे म्हटले जाते. उत्तम आरोग्यासाठी चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. म्हणून तर सातारकर उन्हाळा आणि हिवाळ्याबरोबरच पावसाची तमा न बाळगता दररोज पहाटे आणि नित्यनियमाने चालण्याचा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत.चालण्यामुळे शरीराच्या बऱ्याच व्याधी दूर होत असतात. मन उत्साही राहते, त्यामुळे डॉक्टरदेखील रुग्णांना चालणाचा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. सातारकरांनी हे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे अगदी पहाटेच्या वेळी येथील राजपथ, कर्मवीर पथ, बोगदा, कुरणेश्वर, यवतेश्वर आणि अजिंक्यताऱ्यावर आबालवृद्धांची चालण्याची जणू स्पर्धात सुरू असते. दहा वर्षांपासून ते अगदी ७० वर्षांपर्यंतचे वृद्ध या ठिकाणी दररोज चालताना दिसतात. येथील शाहू स्टेडियममध्ये सकाळी मुलांबरोबच वृद्धांची गर्दी पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी येणारे व्यक्ती सर्वप्रथम चालण्याचा, पळण्याचा व्यायाम करतात. यानंतर आपल्याला खेळात कार्यमग्न होतात.गेली काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी सातारकर पावसाची तमा न बाळगता अगदी रेनकोट, छत्रीसहित घरातून चालण्यासाठी बाहेर पडत आहे. मुसळधार पावसातही सातारकर आपल्या आरोग्याची काळजी पुरेपूर घेताना दिसत आहेत.सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे महिला आरोग्याबाबत किती सजग आहेत, हे यावरून दिसून येत आहे. या महिलांच्या पाठोपाठ युवती ही व्यायामाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शरीराचे स्नायू बळकट करण्याबरोबरच निरोगी राहण्यासाठी चालणे हाच सर्वाेत्तम व्यायाम प्रकार आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी दिवसातून किमान दोन किलोमीटर चालायलाच हवे.चालणे हा बिनखर्चाचा व्यायाम आहे. चालण्यासाठी कुठल्याही व्यायामशाळेत जावे लागत नाही. अथवा पैसे मोजावे लागत नाही. पहाटे निसर्गाच्या सानिध्यात चालल्याने शरीराला मुबलक प्रमाणात ‘ओझोन’ मिळतो. चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरात वाढणारी अतिरिक्त चरबीदेखील कमी होते. एवढेच नाही चालण्यामुळे पोटाचा वाढलेला घेर देखील कमी होतो. चालताना संपूर्ण शरीराची हालचाल होते. त्यामुळे खांदा, हाताचा कोपरा, गुडघा, खुबा या अवयवांची हाडे बळकट होतात. तसेच हाडांची घनता देखील वाढते. चालण्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. चालण्यापूर्वी अथवा कोणाताही व्यायाम करण्यापूर्वी एक कप चहा, दूध अथवा दोन बिस्किटे खाल्यास त्यापासून शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते.चालण्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो. तसेच शारीरिक थकवा ही दूर होतो. त्यामुळे काम करण्यात उत्साह वाढतो. गर्भवती महिलांनाही चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे डॉक्टर सांगतात.