शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोल्हापूर नाक्यावरील मोरी वाहतुकीस होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक उड्डाण पुलाखाली कोयना मोरी आहे. पंकज हॉटेलकडून तसेच शहरातून कऱ्हाड हॉस्पिटलकडून आलेली अनेक वाहने या मोरीतून ...

कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक उड्डाण पुलाखाली कोयना मोरी आहे. पंकज हॉटेलकडून तसेच शहरातून कऱ्हाड हॉस्पिटलकडून आलेली अनेक वाहने या मोरीतून पलीकडे जाऊन कोल्हापूर-सातारा लेनवर पोहोचतात. मात्र, मोरी अरूंद असल्यामुळे मोरीतून वाहनाचा अर्धा भाग बाहेर आल्याशिवाय चालकाला महामार्गावरून कोल्हापूर नाक्याकडून आलेले वाहन दिसत नाही. तसेच याठिकाणी महामार्गावर येताना चढण आहे. कोल्हापूर बाजूकडून येणारी भरधाव वाहने आणि मोरीतील रस्त्याला असलेली चढण यामुळे याठिकाणी अपघात होतात. हे ठिकाणी ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले असून त्याची नोंद ६८२ क्रमांकावर घेण्यात आली आहे.

कोयना मोरीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे याठिकाणी अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुरुवारी कऱ्हाड वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपअधीक्षक रणजित पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सगरे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी मोरी परिसराची पाहणी करून ही मोरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेण्यात आला असून यावर कोणाला काही हरकत असल्यास संबंधितांनी सात दिवसात कऱ्हाडच्या वाहतूक शाखेत आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी केले आहे.

- चौकट

आरसा... असून अडचण, नसून खोळंबा

कोल्हापूर नाक्यानजीकच्या या मोरीत सामाजिक बांधिलकीतून काहीजणांनी आरसा बसविला होता. मोरीतून रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांच्या चालकांना कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहने दिसावीत, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, रस्त्याला चढण असल्यामुळे या आरशाचाही म्हणावा तेवढा उपयोग होत नव्हता. आरसा असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत होता.

फोटो : ०४केआरडी०४

कॅप्शन : कऱ्हाड येथे कोल्हापूर नाक्यानजीक असणाऱ्या या मोरीतून होणारी वाहतूक बंद केली जाणार आहे.