शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा

By admin | Updated: July 3, 2017 13:37 IST

धरण क्षेत्रात पाऊस : गतवषीर्पेक्षा यंदा पातळी चांगली

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0३ : जिल्ह्यातील पश्चिम भागात यावर्षी पावसाने वेळेवर आणि जोरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढू होऊ लागली आहे. गेल्यावषीर्चा विचार करता कोयना धरणात यावर्षी दुप्पटीपेक्षा अधिक साठा आहे. तर धोम, कण्हेर, तारळी, उरमोडीमध्येही गतवषीर्पेक्षा अधिक पाणी आहे. मात्र, बलकवडी धरणातील पाणीसाठा बरोबरीत आहे. गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील पावसालाही सुरूवात जुलै महिन्यातच खऱ्या अथार्ने झाली होती. परिणामी धरणात पाणीसाठा होण्यास तसा उशिरच झाला होता. सुरुवातीच्या काळातही पावसात जोर नव्हता. त्यामुळे चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे धरणे भरण्यासही वेळ लागला. यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होईल असा अंदाज होता. पण, सुरूवातीला हजेरी लाऊन पावसाने नंतर दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चिंता लागून राहिली होती. सातारा शहरातील पाण्याचे नियोजनही एक दिवसाआड करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, दडी मारलेल्या पावसाने दहा दिवसांपासून बरसण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदारपणे पाऊस होत आहे. महाबळेश्वरला तर आठ दिवसांपासून संततधार आहे. त्यामुळे वेण्णा लेक भरुन वाहिला. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या धरणातही गतवषीर्पेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कोयना धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १५ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २ जुलैपर्यंत कोयनेत १३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी १२.९१ होती. तर यावर्षी कोयनेतील पाणीसाठा ३२ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. धोम धरणात सध्या ३.३८ टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी २.७८ टीएमसी पाणीसाठा होता. कण्हेरमध्ये २.३५ असून गतवर्षी १.९२ टीएमसी पाणी आहे. उरमोडीत ४.९९ तर गतवर्षी ३.६२ आणि तारळीत १.३९ आणि गतवर्षी १.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बलकवडी धरणात गतवर्षी ऐवढाच म्हणजे १३.८१ टक्के ऐवढा पाणीसाठा आहे.

पूर्व भागात प्रतीक्षा...

 

जिल्ह्याच्या पूर्व भागातही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. मात्र, पेरणी करायची का नाही, अशी स्थिती आहे. तर अनेकांनी निसर्गावर भरवसा ठेऊन पेरणी केली आहे.