शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

मोर्चा, घोषणांनी दणाणला सातारा

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद : लाल बावट्यांनी गाजविला दिवस..!

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद : लाल बावट्यांनी गाजविला दिवस..!सातारा : राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संप, मोर्चा, सिटूची निदर्शने, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी असे दणाणून सोडणारे वातावरण आज शहरात होते. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, एक रुपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसर कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला. बेकायदेशीर इमारती, गाळा बांधकामाची चौकशी करासातारा : खेड ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर इमारती आणि गाळा बांधकामाची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे झाली आहे.याबाबतचे निवेदन रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, न्यू विकास नगर येथील अनिल कांबळे यांच्या शेजारी असणाऱ्या प्लॉट नंबर ९0 चे बांधकाम हे टीपी प्लान प्रमाणे झालेले नाही. त्यांच्यावर कारवाई करावी. कोयना सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी राखीव खुल्या भुखंडावर बांधकाम करून अनधिकृत गाळे काढले आहेत. येथील सभासदांवर गुन्हे दाखल करावेत. विसावा नाका येथील गुलमोहर प्लाझा या अनधिकृत अपार्टमेंटमध्ये तळघराची मान्यता असूनदेखील तेथे गाळे काढलेले आहेत. येथे सेटबॅक नसल्याने नागरिक, वाहनांना रहदारी करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असणारे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती खेड सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि खेड ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) सातारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा तसेच प्रत्येक नगरपालिकांमध्ये शहर फेरीवाला समिती कार्यान्वीत करून त्याची बैठक घेण्याची मागणी करत सर्वधर्मीय सुशिक्षीत बेरोजगार हॉकर्स संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार आणि शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये फेरीवाल्यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतल्यानंतरही त्याची कार्यवाही झालेले नाही.सर्व नगरपालिकांमध्ये राष्ट्रीय फेरीवाला समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करून फेरीवाल्यांनी म्हटले आहे की, सर्व नगरपालिका कार्यक्षेत्रात हॉकर्स झोन निश्चित करावा. अधिकारी आणि हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण करून हॉकर्सना परवाने देण्यात यावेत. हॉकर्ससाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.निवेदनावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष संजय पवार, संघटक सुनील शिवदास, जिल्हा सरचिटणीस कॉ. शामराव चिंचणे, जावेद नायकवडी, युसूफ बागवान, सलीम शेख, सुनील बेलोशे, राजमहमंद पन्हाळकर, अशोक शिंदे, युवराज माने आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)हॉकर्सवर कारवाई करू नका...राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची परिपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही हॉकर्सवर नगरपालिका व शासनाच्या विभागाने कारवाई करू नये. बॉम्बे रेस्टॉरंट तसेच त्रिशंकू भागातील हॉकर्सना शासन निर्णय लागू करावेत, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हॉकर्सच्या मागण्यांचा विचार नाही झाला तर प्रजास्ांत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याबरोबरच जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा