शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा प्रकल्प विळख्यात..!

By admin | Updated: July 28, 2015 00:31 IST

बेकायदा कृत्यांना ऊत : गावगुंडांची दमबाजी; पाणलोट क्षेत्रालगत जमिनी काबीज, अनेकांनी पाडले फ्लॉट

अरूण पवार - पाटण -स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा व अस्तित्वाचा त्याग करून जमिनी दिल्या. त्यांना घरेदारे सोडून इतरत्र जावे लागले. त्या मोरणा-गुरेघर प्रकल्पावर सध्या धनदांडग्यांचं राज्य निर्माण होऊ लागले आहे. गावगुंड प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना दमबाजी करू लागले आहेत. प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून काही कामे शिल्लक असून, शासनानेही ठेकेदाराचे बिल अडकविले आहे. फार्म हाऊस, बंगले यासाठी मोरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रालगत जमिनी काबीज करून श्रीमंतांनी फ्लॉट पाडले आहेत. त्यामुळे प्रकल्प धनदांडग्यांच्या विळख्यात सापडला आहे. सध्या मोरणा प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, डाव्या व उजव्या कालव्यांची कामे मात्र रखडली आहेत. त्यामुळे १९९६ मध्ये निर्माण झालेल्या या प्रकल्पाचा आजअखेर शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. जवळपास १ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प सध्या तुडुंब भरलाय; मात्र या प्रकल्पावर ठेकेदार, शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही.त्यामुळे आओ-जाओ घर तुम्हारा, अशी गत होऊन बसली आहे. पर्यटनाच्या नावाखाली बाहेर लॅन्डमाफियांनी प्रकल्पासभोवतालच्या जमिनी काबीज केल्या आहेत. फार्म हाऊस बांधण्यासाठी जमिनीचे फ्लॉट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कॅचमेट एरियाला धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या उगमस्थानीच बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे. परवान्याच्या नावाखाली अवैध मासेमारीला उधाण आले आहे. शासनाची कोणतीही यंत्रणा या प्रकल्पाची काळजीपूर्वक देखरेख करताना दिसत नाही. राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ५८ कोटी खर्च केलेल्या मोरणा प्रकल्पाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. कालव्याची कामे अर्धवट...मोरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत असून ती बंद पडलेली आहेत. ठेकेदारांची यंत्रणा, कालवे व मातीचे ढीग अडचणीचे ठरू लागले आहेत. काही ठेकेदारांनी भ्रष्टाचार करून इतरांची लाखोंची देणी रखडविली आहेत. त्यामुळे मोरणा भागात संताप व्यक्त केला जात आहे.