शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकट्याला गाठून वानर करतोय हल्ला

By admin | Updated: August 5, 2014 23:42 IST

यवतेश्वर : अनेक जखमी; ग्रामसभेत करणार म्हणे उपाययोजनेचा ठराव

बामणोली : यवतेश्वर गावात एका वानराने आठवडाभरात उच्छाद मांडला आहे. या वानराने पाच ते सहा व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासंदर्भात म्हणे, उपाययोजना करण्यासंदर्भात ठराव ग्रामसभेत मांडणार आहेत.याबाबत माहिती अशी की, यवतेश्वर, कास पठारावर प्रचंड झाडी आहेत. त्यामुळे या परिसरात वन्य जीवांबरोबरच वानरांची संख्याही मोठी आहे. श्रावण महिना असल्याने येथील यवतेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक या वानरांना खायला देत असतात. त्यामुळे हे वानरांमध्ये माणसांमध्ये वावरत आहे.येवतेश्वर गावातील एक वानर आठवड्यापासून माणसांच्या अंगावर उडी मारुन हाताला चावा घेत आहे. दोन दिवसांपूर्वी जोतिराम भणगे (वय ६२) यांच्या डाव्या पोटरीचा चावा घेतला होता. यामध्ये भणगे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले होते. यामध्ये त्यांच्या पायाला सात टाके पडले आहेत. हे वानर यवतेश्वरमधील शंकर मंदिर परिसरातच वावरत असून सकाळीच गावातील झाडांवर येऊन बसत आहे. झाडीत बसून राहिलेल्या माकडाचा अंदाज येत नाही, मात्र एकट्या माणसांवर अचानक हल्ला चढवत असते. यामुळे परिसरातील वयोवृद्ध, जनावरे चरायला घेऊन जाणारे गुराखींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात पडत असलेल्या पावसामुळे लहान मोठे धबधबे पाण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्यामध्येही वानराची दहशत निर्माण झाली आहे. या वानराचा बंदोबस्त करावा, यासाठी वनविभागाकडे लेखी तक्रारही देऊनही कोणतीही पावले उचलली नाहीत. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थ ठराव करुन संबंधित वानराचा बंदोबस्त करण्यासंदर्भात ठराव करणार आहेत. (वार्ताहर)श्रावण सोमवारी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या ठिकाणी लहानमोठे धबधबे असल्याने लोक थांबत असतात. मात्र, वानरांचा त्रास होत असल्याने भाविकांमध्येही भितीचे सावट पसरले आहे.