शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरवर माकडाचा ‘शोले’

By admin | Updated: June 16, 2016 00:57 IST

कूपर कॉलनीतील प्रकार : उंचावरील टॉवरवर खाली उतरता येईना

सातारा : सर सर झाडावरून उड्या मारणाऱ्या माकडांना कशाचीच भीती वाटत नाही. परंतु अती उंच टॉवरवर चढणाऱ्या माकडाला मात्र भीती पोटी खाली उतरता आले नाही. अगदी सकाळी-सकाळी या माकडाने शोले फिल्मप्रमाणे जणू आत्महत्या करायला चढलेला दृष्यच केला होता. असे प्रत्यक्षदर्शनी पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले.सदर बझार येथील कूपर कॉलनी लगत भले मोठे मोबाईल टॉवर आहे. या टॉवरवर वेगळीच झाडे झुडपे असून, या ठिकाणी सतत माकडांची टोळकी दिसून येतात. बुधवारी सकाळी ७ वाजता दोन माकडांची भांडणे लागली असता त्यातील एका माकडाने या टॉवरवर उडी मारत अती उंची ठिकाणी पळत सुटले. आणि जाऊन थांबले परंतु त्या नंतर त्या माकडाने उंचीवर जाऊन खाली बघीतले तर त्याला खाली उतरताना मोठी अडचण येऊ लागली. ते टॉवरमधील पॅसेजवर हेलपाटे मारून खाली उतरण्यासाठी धडपडू लागले.परंतु खाली उतरता येत नव्हते. १०० फुटाहून अधिक उंच असणाऱ्या या टॉवरमध्ये अडकलेले हे माकड जवळपास दोन ते तीन तास तसेच घुटमळत होते. खाली येण्यासाठी त्याचा प्रयत्न करताना मध्येच दचकत पुन्हा पॅसेजमध्ये जाऊन बसत होता. त्याच्या या सर्व हालचाली खालून काही नागरिक पाहत होते. परंतु त्याला मदत करणे अवघड होते. त्यामुळे बघ्याची भूमिका घ्यावी लागली.दरम्यान, सकाळी ९ वाजता हे माकड हळूहळू थोड्या वेळाने खाली आले. त्यानंतर त्याने तेथे थोडी विश्रांती घेत. पुन्हा काही वेळाने खाली येऊन त्याने शेवटी झाडावर उडी मारली. अन् निघून गेले. शोले फिल्ममध्ये ज्या पद्धतीने अभिनेत्याने आपली मागणी मान्य करण्यासाठी आत्महत्याचा इशारा दिला होता. त्याच पद्धतीने हे माकडही स्टंट करतेय का काय? अशी चर्चा नागरिकांत होती. खुप उंचीवर गेल्याने खाली उतरताना हे माकड प्रचंड घाबरल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)भरभर उंची गाठल्यानंतर पुन्हा खाली उतरताना माकडाची त्रेधा उडाली. त्यामुळे मजल-दरमजल करत विश्रांती घेत माकड हळूहळू या टॉवरवरून खाली उतरत होते. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी माकडाचे हे चाळे मोबाईलमध्ये कैद केले.