शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आनंदांच्या क्षणात अन् संकटकाळात ‘हम साथ-साथ है !’

By admin | Updated: January 1, 2016 00:06 IST

शोेध सर्वात मोठ्या फॅमिलीचा : शहा घराण्याच्या सर्वोच्च यशाचे श्रेय केवळ संयुक्त कुटुंब पध्दतीलाच... बिग फॅमिली

प्रगती जाधव-पाटील - सातारा --‘हेम’ ग्रुपच्या शतकीय वाटचालीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचे आमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचले आणि कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी ‘रॉटव्हीलर’ने माझ्या उजव्या हाताचा चावा घेतला. जखम इतकी मोठी की किमान चार दिवस दवाखान्यातील मुक्काम पक्का! कार्यक्रम रद्द व्हायला नको म्हणून माझी धडपड सुरू होती, डॉक्टर वेदनाशामक इंजेक्शन देत होते; पण कार्यक्रमात येण्याचे बळ दिले ते कुटुंबाच्या शक्तीने!,’ कुटूंबाच्या एकीची वीण बिपीनभाई सांगत होते.बिपीन कांतीभाई शहा आॅटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारी तिसरी पिढी! साताऱ्यासह मायापुरी मुंबईत आपल्या कार्यकतृत्वाने यशाचा झेंडा रोवणाऱ्या शहा कुटुंबीयांचे यश हे त्यांच्या संयुक्त कुटुंबाचे असल्याचे जाणवते. घरात तीन पिढ्या एकत्र राहतात, बाजारपेठेतील चढ-उताराविषयी ते परस्परांशी चर्चा करतात; पण घरातील ज्येष्ठांचा प्रत्येक शब्द हा आदेशाप्रमाणे घेऊन बिपीन, हेमंत आणि विपुल शहा मार्गक्रमण करतात. त्यांची पुढची पिढीही पुढे जात आहे.एकत्र कुटुंबात राहिल्याने आम्ही व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देऊ शकलो. ‘मायक्रो फॅमिली’ची अ‍ॅडजस्टमेंट आम्हाला कधी करावीच लागली नाही. कोणत्याही कार्यक्रमात जाताना मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात देणं हक्काचं वाटायचं. आजारी पडलं तर आईने केलेला काढा हजारो औषधांपेक्षा उपयुक्त असतो, असे बिपीनभाई सांगतात. ‘कुटुंब एकत्र आले की, ती ऊर्जा ताकद बनून राहते. जगात शहा कुटुंबीय कुठेही असले तरी लक्ष्मीपूजन साताऱ्यात कर्मचाऱ्यांसह आणि वर्षातून एकदा देवदर्शनासाठी गुजरात दौरा हे ठरलेलाच आहे,’ असे विपुलभाई सांगतात. शहा कुटुंबाततब्बल १८ सदस्य... कालिदास भाईचंद शहा आणि हेमकुवर कालिदास शहा यांना दोन मुले कांतीभाई आणि विनोदभाई. कांतीभार्इंची पत्नी जसवंती यांना दोन मुले बिपीन आणि हेमंत. बिपीन-ममता यांना ईशान आणि मानसी ही दोन मुलं, तर देवांशी ही स्नुषा. हेमंत-निपा यांना आशंक आणि आलेखा ही दोन मुलं, तर सून ध्वनी. विनोदभार्इंची पत्नी साधना त्यांना एक मुलगा विपुल. विपुल-कविता यांना हेनल आणि आयुष ही दोन मुलं.